शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पावसाळ्यात मुंबई - पुण्याजवळ फिरायला जाण्यासाठी खास लोकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 15:35 IST

मान्सूनचे राज्यात काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासूनच पावसाचा मनसोक्त आनंद घेण्याच्या तयारीला लागले असतील.

मुंबई: मान्सूनचे राज्यात काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासूनच पावसाचा मनसोक्त आनंद घेण्याच्या तयारीला लागले असतील. कुठे जायचं या ठिकाणांचा शोध घेत असतील. त्यामुळे अशांसाठी आम्ही पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. 

1) कोंडेश्वर धबधबा- बदलापूर

मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून पूर्वेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉईंट आहे. शंकराच्या मंदिरामुळेच त्या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून अधिक उंचीवरून कोसळणा-या या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी फक्त स्थानिकच नव्हे तर मुंबई व बाहेरूनही अनेक पर्यटक येतात. तेथे जाण्यासाठी तुमची स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच अन्यथा बदलापूरला उतरून टमटमही मिळू शकते.

2) माळशेज घाट- कल्याण-मुरबाड मार्ग

मुंबईतील ट्रेकर्स व पिकनकिसाठी जाणा-या तरूणांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा माळशेज घाट पावसाळ्यात हिरवाईने अक्षरश: नटलेला असतो. या घाटातील मनोरम दृश्यं, कड्यांवरून कोसळणारा पाऊस आणि तेथील धबधबे यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. तसेच पावसाळ्यात येथील जलाशयात येणारे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते. तसेच घाटाच्या पायथ्याशी अनके चांगली रिसोर्ट्स असून उत्तम जेवण मिळते.

3) पळस दरी – खोपोली

मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेले हे गाव पावसाळी पिकनिकसाठी एक उत्तम ठिकाण असून पर्यटकांचा आवडता स्पॉट आहे. येथून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, डोंगरांवर पसरलेली हिरवाईची झालर, जवळच असलेला सोनगिरी किल्ला यामुळे हा स्पॉट पिकनिक व ट्रेकर्ससाठी एकदम चर्चेत असतो.

४) कान्हेरी – बोरीवली

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही काही निवांत ठिकाणे असून उपनगरातील आवडता पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणजे कान्हेरी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी परिसरात अनेक धबधबे असून कॉलेज तरुणांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटवरून कान्हेरी गुंफेकडे जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत.

५) भिवपुरी धबधबा- भिवपुरी

मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्थानकाहून शेतातून जाणारी पाउलवाट अवघ्या अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याकडे नेते. माथेरानच्या पठारावरून येणारं हे पाणी धबधब्याच्या रुपाने खाली येतं आणि त्याचमुळे हा धबधबा सेफ असून वीकेंड्सना येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. स्थानकाजवळ काही हॉटेल्स असून तेथे चांगले जेवळ मिळते.

६) माथेरान

भर पावसात माथेरानला जाऊन भिजण्याची मजा काही औरच. नेरळ स्टेशनला उतरून मिनी ट्रेनद्वारे माथेरानला जाताना खूप मजा येते. तसेच नेरळ ते माथेरान या ट्रेन प्रवासादरम्यान अनेक धबधबेही लागतात. अनेक पर्यटक तेथे उतरून धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात.

७) लोहगड किल्ला

लोहगड हा राज्यातील एक लोकप्रिय किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच डोंगरांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर म्हणजेच संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगडही येथेच आहे. अंदरमावळ आणि पवनमावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे.

८) मुळशी धरण

पुणेकरांच्या मनाला पावसाळ्यात बहर आणणारं, हिवाळ्यात गारवा अन् ऊन्हाळ्यात निरव शांतता देणारं, मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. या धरणातील पाणी पुणे जिल्ह्यात सिंचनासाठी वापरले जाते. दुरवर पसरलेलं पाणी, त्यात पक्ष्यांची सदाबहार गाणी.. सभोवताली विस्तारलेली वनराई, मनाला सुखाऊन जाई.. स्वच्छ हवा, त्यात तो पाऊस नवा.. क्षणभर विश्रांती देणारं मुळशी हे पुणेकरांच हक्काच पर्यटन स्थळ.

९) भंडारदरा

भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालाय. भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

१०) सिंहगड

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायर्‍यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो. याचे आधीचे नाव कोंढाणा आहे.

11) कळसूबाई शिखर

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई हि आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला उत्तम ठिकाण.

टॅग्स :Travelप्रवासmonsoon 2018मान्सून 2018