शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत हिवाळ्यात साजरे होतात अनेक महोत्सव. तुम्हाला कुठे जायचं ते ठरवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:56 IST

हिवाळ्याच्या दिवसात देशातल्या अनेक भागांत विविध सांस्कृतिक फेस्टिव्हल्सचंही आयोजन होत असतं. या फेस्टिव्हलमधून त्या राज्याच्या संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडतं. त्यामुळे एकाचवेळी ट्रिप आणि एखाद्या राज्याची जवळून ओळख करु न घेण्याची संधी कशाला सोडायची?

ठळक मुद्दे* हॉर्निबल फेस्टिव्हल नागा संस्कृतीची ओळख करु न देणारा हा महोत्सव.या महोत्सवात नागालॅण्डमधल्या विविध आदिवासी जमातींना जवळून भेटण्याची संधी तुम्हाला मिळते.* पौष मेला हा शांतिनिकेतनचा ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव आहे. याची सुरूवात गुरु देव रवींद्रनाथ टागोरांनीच केलेली होती. बंगालमध्ये येणाºया प्रत्येक पर्यटकाला शांतीनिकेतनच्या या उत्सवाचं आकर्षण असतं.* माऊंट अबू हे राजस्थानातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण. इथला हिवाळी महोत्सव हे दिवसेंदिवस पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण केंद्र बनत चालला आहे. राजस्थानी कलावंत त्यांच्या हस्त आणि शिल्पकलांचे नमुने दाखवण्यासाठी इथे जमतात.

 

अमृता कदमगुलाबी थंडी म्हणजे ट्रीप प्लॅन करण्यासाठीचा उत्तम काळ. कदाचित त्यामुळेच या काळात देशातल्या अनेक भागांत विविध सांस्कृतिक फेस्टिव्हल्सचंही आयोजन होत असतं. या फेस्टिव्हलमधून त्या राज्याच्या संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडतं. त्यामुळे एकाचवेळी ट्रिप आणि एखाद्या राज्याची जवळून ओळख करु न घेण्याची संधी कशाला सोडायची? त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाºया काही महत्त्वाच्या फेस्टिव्हल्सची ओळख नक्की करु न घ्या. म्हणजे त्यांना जोडूनच तुमची ट्रीप प्लॅन करणं तुम्हाला जास्त सोपं जाईल.हॉर्निबल फेस्टिव्हल, (नागालॅण्ड)तारीख- 1 ते 10 डिसेंबर 2017.नागा संस्कृतीची ओळख करु न देणारा हा महोत्सव. या महोत्सवात नागालॅण्डमधल्या विविध आदिवासी जमातींना जवळून भेटण्याची संधी तुम्हाला मिळते. इथे येऊन नागा लोकांचं खाद्य चाखून पाहा, त्यांच्या संस्कृतीतली गाणी ऐकाआणि नागांच्या पारंपरिक कलेची चुणूक दाखवणा-या हजारो वस्तूंमधून तुम्हाला हवी ती वस्तू खरेदीसाठी निवडा. शिवाय सगळ्यात खास आकर्षण म्हणजे तुम्हाला या महोत्सवात पारंपरिक तिरंदाजी आणि कुस्त्यांचाही कार्यक्र म पाहायला मिळतो.

गाल्डन नामचो,( लडाख)तारीख- 12 डिसेंबरहा महोत्सव लेहमध्ये ‘जे त्सोंगखापा’ या बौद्ध गुरुच्या जयंतीदिवशी आयोजित केला जातो. तिबेटियन बौद्ध धर्मातले एक प्रमुख गुरु म्हणून ते ओळखले जातात. तिबेटियन बौद्धांमध्ये जेलूग पंथांची स्थापना त्यांनी केली. याच महोत्सवानं लडाखमधल्या नवीन वर्षाचीही सुरूवात होते. बौद्ध मठ आणि शहरातल्या इमारतींवर आकर्षक रोषणाई केली जाते. घरोघरी थुक्पा आणि मोमोसह पारंपरिक पदार्थांची रेलचेलही पाहायला मिळते.

 

पेरुमिथट्टा थारावाद कोट्टमकुझी,( केरळ)तारीख- 6 ते 15 डिसेंबरतब्बल 10 दिवस चालणारा हा महोत्सव केरळमधला एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्र म आहे. इथे तुम्हाला थिय्याम या केरळमधल्या लोकनृत्याच्या अनेक छटा पाहायला मिळतील. एलेयूर थिय्यम, चामुंडी थिय्यम, पंचरूला थिय्यम आणि मुथूर थिय्यम असे सगळे प्रकार या एका महोत्सवात साद होतात. कलावंत पुराणातल्या काही दैवतांचं रु प घेऊन आपली कला सादर करतात.

पौष मेला, पश्चिम बंगालतारीख-23 ते 26 डिसेंबर

पौष मेला हा शांतिनिकेतनचा ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव आहे. याची सुरूवात गुरु देव रवींद्रनाथ टागोरांनीच केलेली होती. बंगालमध्ये येणा-या प्रत्येक पर्यटकाला शांतीनिकेतनच्या या उत्सवाचं आकर्षण असतं. इथे तुम्ही रवींद्रसंगीत ऐकू शकता, अनेक स्थानिक लोकनृत्याचे प्रकार पाहू शकता आणि स्थानिक हस्तकलेचे नानाविध नमुनेही खरेदी करु शकता.

 

हिवाळी महोत्सव, माऊंट अबू, राजस्थानतारीख- 29, 30 डिसेंबर

माऊंट अबू हे राजस्थानातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण. इथला हिवाळी महोत्सव हे दिवसेंदिवस पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण केंद्र बनत चालला आहे. राजस्थानी कलावंत त्यांच्या हस्त आणि शिल्पकलांचे नमुने दाखवण्यासाठी इथे जमतात. यासोबतच राजस्थानी लोकसंगीत ऐकण्याची इथले घुमड, गैरसारखे पारंपरिक लोकनृत्य पाहण्याची संधीही या महोत्सवात तुम्हाला मिळते.हे सगळे महोत्सव पाहणं तर शक्य नसतं. पण यातला एखाद्या महोत्सवाला तरी आवर्जून भेट द्या.