शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉननं केलीय 10 वस्तूंची यादी. या वस्तू जगभरातले प्रवासी प्रवासाला जाताना बाळगतातच! तुमच्याकडे यापैकी काय आहे? तुम्हाला यातलं काय हवंय?

By admin | Updated: May 30, 2017 18:24 IST

प्रवासासाठी या दहा गोष्टी जगभरात हिट आहे. अमॅझॉनने तशी यादीच केली आहे.

 

- अमृता कदम

प्रवासाच्या तयारीचा सगळ्यांत महत्त्वाचा भाग म्हणजे शॉपिंग. त्यातही आता पायपीट न करता केवळ एका क्लिकवर आपल्याला हव्या त्या वस्तू घरपोच मागवता येत असल्यानं शॉपिंगसाठी वेगळा वेळ काढण्याचीही गरज नाही. प्रत्येकजण आपल्या प्रवासातल्या गरजेनुसार आणि हौसेनुसारच वस्तू खरेदी करतात. पण तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या अनेकांच्या शॉपिंग लिस्टमध्ये समान दिसतील किंवा त्यांची मागणी ही जास्त असते. सध्याच्या सोप्या भाषेत सांगायचं तर त्या ‘ट्रेंण्डिंग’ आहेत.

‘अ‍ॅमेझॉन’नं प्रवासासाठीच्या त्यांच्या बेस्टसेलर्सची एक यादीच तयार करायला घेतली. ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ नावानं तयार केलेल्या या यादीमध्ये सध्या चलतीत असलेल्या 10 ट्रॅव्हल अक्सेसरीजची यादी दिली आहे. जी सगळ्याच फिरायला जाणाऱ्या लोकांच्या बाबतीत लगू पडते.

1. ट्रॉली बॅग हॅण्ड लगेज

एअरलाइन्सच्या हॅण्डबॅगच्या वजनाच्या निकषानुसार तयार केलेल्या या बॅगेत तुलनेनं अधिक सामान बसू शकतं. आतल्या ऐसपैस जागेशिवाय या बॅगेच्या पुढच्या बाजूलाही कप्पे आहेत, जे छोटे छोटे नसून व्यवस्थित हाताळता येतील असे आहेत. त्यामुळेच नेहमी विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांचा कल हा या ट्रॉली हॅण्डबॅगकडे वाढताना दिसतोय.

2. क्रेडिट कार्ड होल्डर वॉलेट

प्रवासात सगळ्यात सांभाळून ठेवावी लागतात ती तुमची क्रेडिट  कार्ड, डेबिट कार्ड. खबरदारी म्हणून मग एक कार्ड बॅगेत, एक कार्ड जवळ अजून एखादं असेल तर ते तिसरीकडेच असे उपाय केले जातात. हे क्रेडिट कार्ड होल्डर तुम्हाला तुमची सगळी कार्डस नीट ठेवायला मदत करते. या होल्डरमध्ये क्लिअर पॉकेट्स आहेत. त्यामुळे त्यात तुम्ही तुमचं एखादं ओळखपत्रंही ठेवू शकता. कारण प्रवासात अनेकदा तुम्हाला तुमचं ओळखपत्र वापरायला लागू शकतं. या वॉलेटला छानपैकी झीप असते. शिवाय दहा-बारा कार्डसच्या हिशोबानं रचना असल्यानं ते फार लठ्ठ किंवा कॅरी करायला अवघड जात नाही.

 

                    

3. कॅनव्हास शोल्डर बॅग

ही सॉफ्ट  कॉटन शोल्डर बॅग हॅण्डबॅगप्रमाणे सामान कॅरी करायला वापरु शकता किंवा अगदी लॅपटॉप बॅग म्हणूनही वापरु शकता. मोठ्या कप्प्याबरोबरच आकर्षक बटन्स असलेली पॉकेट्स हे या बॅगचं वैशिष्ट्य. या कप्प्यांमध्ये प्रवासात जवळ बाळगायची कागदपत्रं जपून ठेवता येतात.

4. पॅकिंग क्यूब्स

अनेकांना व्यवस्थितपणे सामान भरताच येत नाही. कितीही प्रयत्न केला तरी बॅगेमध्ये सगळी कोंबाकोंबीच दिसते. त्यामुळेच कदाचित पॅकिंग क्यूब्सच्या सेटची मागणी वाढत आहे. या सेटमध्ये 7 क्यूब्स असतात. हे क्यूब्स लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे असतात. त्यानुसार तुम्ही तुमच्या सामानाची विभागणी करु न पॅकिंग करु शकता. त्याचबरोबर या सेटमध्ये 3 लॉण्ड्री पाऊच आणि एक शू बॅगही येते. प्रवासातले मळके कपडे कशात ठेवायचे हा तुमचा प्रश्नही लाण्ड्री पाऊच सोडवतो. सर्वांत महत्तवाचं म्हणजे हा सगळा सेट वॉटरप्रूफ आणि धुता येण्यासारखा आहे.

 

           

5.मल्टी कलर स्ट्राइप्ड कॅनव्हास हँडबॅग

या कॅज्युअल कॅनव्हास हॅण्डबॅग मूव्हर्स अ‍ॅण्ड शेकर्स चार्टवर ट्रेण्डिंग आहेत. या बॅगेमध्ये तुम्हाला तीन प्रकारचे आॅप्शन आहेत. तुम्ही पर्सप्रमाणे खांद्याला अडकवण्याची बॅग, शोल्डर बॅग किंवा सरळ हॅण्डलला धरु न हॅण्डबॅगप्रमाणे वागवता येणाऱ्या बॅग आहेत. आपआपल्या आवडीप्रमाणे आणि स्टाइल स्टेटमेण्टप्रमाणे आपल्याला बॅग निवडता येतात. शिवाय गरजेच्या सगळ्या वस्तू या बॅगमध्ये मावतात.

6. लेदरचे लगेज टॅग

प्रवासात आपलं सामान हरवू नये किंवा गहाळ झाल्यास ते नीट परत मिळावं म्हणून हे टॅग चांगलेच उपयुक्त ठरतात. तुमचं नाव आणि पत्ता पारदर्शक पाकिटामध्ये लिहून ठेवायचं आणि त्यावर लेदरचा फ्लॅप टाकायचा. म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती अनावश्यकपणे इतरांना कळणारही नाहीत. यामध्ये तुम्ही तुमच्या प्रवासाची दोन्ही वेळेची माहिती लिहू शकता. म्हणजे तुम्ही जाणार आहात तिथला आणि तुमच्या घरचा पत्ता लिहू शकता. हा टॅग लावलेली तुमची सूटकेस तुम्हाला चटकन ओळखू यावी म्हणून गडद रंगातल्या आठ शेड्स उपल्बध आहेत.

7. चांदीच्या मिश्रधातूची की रिंग 

एखाद्या अ‍ॅडव्हेन्चर ट्रीपवर जाताना ही रिंग बरोबर घेऊन जाता येते. तसा याचा काही उपयोग नाही...फक्त थोडीशी स्टाईल!  "You"re braver than you believe, stronger than you seem, smarter than you think"  सारखे प्रेरणादायी वाक्यं या रिंगवर कोरलेले दिसतात. याची किंमतही फार जास्त नसते.

8. कॅनव्हासची डफल बॅग

छोट्याशा ट्रीपसाठी अत्यंत योग्य. यामध्ये तुमचे मोजके कपडे, शूज आणि इतर मोजक्या गरजेच्या वस्तू आरामात बसू शकतात. त्यामुळे विमानात केबिनमध्येही ही बॅग घेऊन जाता येते. एक्सपाण्डेबल झीपमुळे बॅगेचा आकारही थोडासा वाढवता येऊ शकतो. साइड-पॉकेट्समुळे छोट्या-छोट्या वस्तूही यात नीट बसू शकतात.

 

                

9. डबल घडीचं वॉलेट

आतमध्ये वेगवेगळी चलनं ठेवण्यासाठी कप्पे आहेत, तसेच नऊ कार्ड होल्डर्स आणि पारदर्शक आयडी कार्ड होल्डरही आहे.

10. 4 चाकांची एक्सपान्डेबल सूटकेस 

या सूटकेसला चार चाकं, टॉप, बॉटम तसेच साइड हॅण्डल आणि समोरचं एक्सपाण्डेबल पॉकेट यांमुळे लांबच्या प्रवासासाठी या बॅगला प्रवाशांची पसंती मिळत आहे. केबल लॉकमुळे बॅग आणि बॅगेतलं सामान दोन्ही सुरक्षित राहतं. तुम्हीही प्रवासाला जाण्याचं नियोजन करत असाल तर तुमच्या सामानामध्ये या यादीतल्या वस्तूंची भर नक्की घाला. तुमच्या प्रवासी लूकला ट्रेण्डी बनवण्याचं काम या वस्तू नक्की करतील.