केरळ हे देशातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक सौंदर्याने नेहमीच पर्यटकांना भुरळ घातली आहे. याच केरळमधील सुंदर शहर आहे कोल्लम. इथे निर्सगाने भरभरुन दिलं आहे. तुम्हाला हे वाचून आनंद होईल की, कोल्लम हे शहर वर्ल्डच्या क्रूज नकाशावर टूरिस्ट डेस्टिनेशन म्हणून टूरिज्म नकाशावर सामावून घेण्याचं काम सुरु आहे. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की, कोल्लम किती सुंदर आहे. तुम्हीही अशाच एका शानदार आणि यादगार ट्रिपच्या शोधात असाल तर इथे भेट देऊ शकता.
मुनरो आयलॅंड
शहराच्या धावपळीपासून दूर, दाट जंगल, पक्ष्यांची किलबिलाट आणि तलावांच्या शांत पाण्याची मजा मुनरो आयलॅंडवर तुम्ही घेऊ शकता. हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या आयलॅंडचं नाव एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नावावर ठेवण्यात आलं होते. हे आयलॅंड कल्लड नदी आणि अष्टमुडी तलावाच्या संगमावर स्थित आहे.
थंगसेरी लाइट हाऊस
केरळच्या कोल्लम जिल्ह्यात थंगसेरी लाइट हाऊस हे ठिकाण फिरण्यासाठी फार चांगलं ठिकाण आहे. हे केरळमधील दुसरं सर्वात उंच लाइट हाऊस आहे. याची उंची ४१ मीटर आहे. हे लाइट हाऊस एका मीनारसारखं आहे. लाल आणि पांढऱ्या रंगाने याला पेन्ट केलं आहे.
पालारुवी वॉटरफॉल
कोल्लममध्ये पालारुवी वॉटरफॉलचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता. हा भारतातील सर्वात उंच वॉटरफॉलमध्ये ३२व्या क्रमांकावर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य नेहमीसाठी मनात घर करुन राहील असंच आहे. हा वॉटरफॉल ३०० फूट उंच आहे.
कोल्लम बीच
कोल्लम बीच हा महात्मा गांधी बीच या नावानेही ओळखलं जातं. हा बीच कोल्लम शहरात आहे. हा बीच फिरण्यासोबतच डेस्टिनेशन वेडिंगसाठीही प्रसिद्ध आहे.
अष्टमुडी तलाव
अष्टमुडी तलाव कोल्लमच्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथे केरळमध्ये सर्वात जास्त पर्यटक भेट देतात. ओल्या जमिनीमुळे या ठिकाणाला एक वेगळंच महत्त्व आहे.