शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच, दिवसातून तीन वेळा रंग बदलते हे शिवलिंग; एकदा तरी दर्शन नक्की घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 18:43 IST

भारतामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांची स्थापना किंवा मंदिरात स्थापन केलेल्या मूर्ती यांबात अनेक आश्चर्य व्यक्त करणाऱ्या गोष्टी ऐकण्यात येतात. परंतु राजस्थानमध्ये एक असं मंदिर आहे, ज्याबाबत माहीत झाल्यानंतर तुम्ही खरंच अवाक् व्हाल.

भारतामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांची स्थापना किंवा मंदिरात स्थापन केलेल्या मूर्ती यांबात अनेक आश्चर्य व्यक्त करणाऱ्या गोष्टी ऐकण्यात येतात. परंतु राजस्थानमध्ये एक असं मंदिर आहे, ज्याबाबत माहीत झाल्यानंतर तुम्ही खरंच अवाक् व्हाल. जर तुम्ही धार्मिक ट्रिपवर जाण्याचा विचार करत असाल तर राजस्थानमधील 'अचलेश्‍वर महादेव'च्या दर्शनासाठी नक्की जा. या मंदिरामध्ये असलेलं शिवलिंग आपलं रंग बदलतं. त्यामुळे फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक लोकं याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. 

तीन रंगाचं दिसतं हे शिवलिंग 

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यामध्ये असलेलं 'अचलेश्‍वर महादेव' मंदिराबाबत अनेक तज्ज्ञ सांगतात की, शिवलिंग दिवसातून तीनवेळा रंग बदलतं. सकाळच्या वेळी हे शिवलिंग लाल रंगाचं दिसतं. तेच दुपारच्या वेळी केशरी रंगाचं आणि रात्री काळ्या रंगाचं दिसतं. 

शिवलिंगाचा ठावचं मिळेना 

स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार, शिवलिंगाच्या रंग बदलण्याच्या गोष्टीमागील कारण शोधण्यासाठी अनेकदा मंदिराच्या आजूबाजूला खोदकाम करण्यात आलं. परंतु खोलवर खोदकाम करूनही शिवलिंगाचा ठाव काही सापडलाच नाही. शेवटी हैराण झालेल्या लोकांनी भगवान शंकराची कृपा समजून खोदकाम बंद केलं. 

कोणीच समजू शकलं नाही रहस्य...

'अचलेश्‍वर महादेव' मंदिरातील शिवलिंगाच्या रंग बदलण्यामागील खरं कारण शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यासाठी पुरातत्व विभागानेही अनेक प्रयत्न केले परंतु त्यांनाही यश मिळालं नाही. परंतु जेव्हा काहीच हाती लागलं नाही त्यावेळी सर्वांनी प्रयत्न बंद करून हा दैवी चमत्कार असल्याचे मान्य केलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन