शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित

By नामदेव मोरे | Updated: June 11, 2023 13:36 IST

राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. 

- नामदेव मोरे, किल्ले रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड सह्याद्रीच्या रांगेतून दक्षिणेस पसरलेल्या व घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर गोवा, कोकण व महाराष्ट्र यांच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला असला, तरी स्वराज्यात त्याला विशेष महत्त्व. राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. 

कोल्हापूरच्या माणसांप्रमाणे तेथील किल्लेही रांगडेच. जिल्ह्यातील १३ प्रमुख किल्ल्यांमध्ये सर्वांत रांगडा म्हणून रांगणाची ओळख आहे. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याविषयी ‘एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित’ असे म्हटले जाते. या वैशिष्ट्यामुळेच इतिहासप्रेमींची पावले गडाकडे वळत असतात.

औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेमध्येही त्याला हा किल्ला जिंकता आला नाही. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरून छोट्या वाटेने पुढे गेल्यावर पहिला दरवाजा येतो. रणमंडळ संज्ञेप्रमाणे या दरवाजाची रचना केली आहे. पहिल्या दरवाजापासून पुढे गेले की बुरुजाआड लपलेला दुसरा दरवाजा आढळतो. पायवाटेने पुढे गेले की कोरडा तलाव, दगडात बांधलेली जोती आढळतात. एक बुरुजात हनुमंताचे शिल्प कोरलेले पाहावयास मिळते. 

गडावर बारमाही पाणी असलेला तलाव पाहावयास मिळतो. रांगणाई मंदिर व इतर छोटी मंदिरेही आहेत. गडावर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, तलाव, दरवाजे, तटबंदी व पाहण्यासारखे बरेच काही आहे. गडाच्या सभोवतीचे जंगल, भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात येते. प्रत्येक इतिहासप्रेमींनी भेट द्यावी, असाच हा किल्ला असून वर्षभर शिवप्रेमींचा गडावर राबता असतो.

काय पाहाल?

- गडावरील पहिला, दुसरा दरवाजा, रांगणाई देवीचे मंदिर, शिवमंदिर, वाडा, वाड्यातील विहिर, तटबंदी, जुन्या बांधकामाचे अवशेष, शिलालेख, भव्य तटबंदी, चिलखती बुरूज आहे. - कोकणातील सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या सीमेवर असलेला हा किल्ला म्हणजे स्वराज्याचा राखणदारच. - या गडालाही निसर्गाचे वरदान लाभले असून पुरातन बांधकामाच्या व इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा येथे पाहावयास मिळत असतात. - माथ्यावरील बारा कमानी असलेल्या दगडात खोदून काढलेला दरवाजाही पाहता येतो.

कसे जाल?

कोल्हापूर-गारगोटी कडगावमार्गे पारगावला जाता येते. पाटगावपासून तांब्याचीवाडी मार्गे पटवाडी व तेथून पुढे चिक्केवाडीपर्यंत जाता येते. चिक्केवाडीतून पायवाट रांगण्यावर जाते. कोकणातील कुडाळजवळील नारुर आणि केखडे गावातूनही रांगणा किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTravel Tipsट्रॅव्हल टिप्स