(Image Credit : Thrillophilia)
भारतात एखादी ट्रिप प्लॅन करायची असेल आणि सुंदर पण अॅडव्हेंचर्स ठिकाणी जाण्याची इच्छा असेल तर सर्वात आधी हिमाचल प्रदेशाचंनाव सर्वांच्या ओठी येतं. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत की, जिथे जाऊन तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता. हिमाचलमधील असचं एक ठिकाण म्हणजे, खीरगंगा. असं सांगितलं जातं की, या ठिकाणी भगवान शंकरांनी 3000 वर्षांपर्यंत ध्यान आणि चिंतन केलं होतं. अॅडव्हेंचर लाइफचा आनंद घ्यायचा असेल तर खीरगंगाला भेट देण्याचा प्लॅन नक्की करा.
ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी बेस्ट प्लेस
ट्रेकिंग लवर्सनी हिमाचल प्रदेशातील खीरगंगा या ठिकाणाला भेट देणं अत्यंत आवश्यक आहे. ट्रेकिंगचा रस्ता बर्शेनीपासून सुरू होऊन पुढे 10 किलोमीटरपर्यंत जातो. यादरम्यान तुम्ही खीरगंगेचं सौंदर्य पाहू सकता. ट्रेकिंगच्या रस्त्यामध्ये उंच पर्वतरांगा आणि घनदाट जंगलांमधून जाण्याचा आनंद घेऊ शकता.
गरम पाण्याची कुंड
खीरगंगेमध्ये असलेल्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये हिंदू आणि शिख श्रद्धाळू लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. थंडीमध्ये येथील डोंगर बर्फाने झाकून जातात. परंतु, येथील गरम पाण्याची कुंड जशीच्या तशी राहतात. वातावरणातील वाढलेल्या थंडाव्यामध्ये या कुंडांमध्ये आंघोळीचा आनंदही घेऊ शकता.
बर्फाने झाकलेल्या डोंगररांगा
खीरगंगेमधील सुंदर दऱ्या, मखमली गवत आणि बर्फाने झाकलेले पर्वत तुमची ट्रिप आणखी सुंदर करण्यासाठी नक्कीच मदत करतील. येथे तुम्हाला उन्हाळ्यातही थंडीचा अनुभव घेता येईल. येथील तापमान तसंही कमीच असतं.
कसे पोहोचाल?
खीरगंगा येथे जाण्यासाठी दिल्लीपासून तुम्ही बसने थेट मनाली किंना भुंतरपर्यंत पोहोचू शकता. भुंतरपासून प्रायव्हेट टॅक्सी किंवा बसने बर्शेनी आणि कसोल येथे जाऊ शकता. येथून खीरगंगाला जाण्यासाठी जवळपास 10 किलोमीटर चलत जावं लागेल.