शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

साऊथ-ईस्ट आशियाच्या पर्यटनासाठी IRCTC ने आणले स्पेशल टूर पॅकेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:20 PM

आयआरसीटीसी नेहमीच पर्यटकांसाठी वेगवेगळ्या आणि मुख्यतः खिशाला परवडणाऱ्या टूर ऑफर्स घेऊन येत असते. आताही IRCTC ने पर्यटकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे.

आयआरसीटीसी नेहमीच पर्यटकांसाठी वेगवेगळ्या आणि मुख्यतः खिशाला परवडणाऱ्या टूर ऑफर्स घेऊन येत असते. आताही IRCTC ने पर्यटकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. पण यावेळी देशातील नव्हे तर देशाबाहेरील ठिकाणांना भेट देण्याची सुवर्णसंधी आयआरसीटी उपलब्ध करून देत आहे. IRCTC टूरिज्मच्या विविध पॅकेजपैकी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि इस्त्राइल व्यतिरिक्त आता साऊथ ईस्ट आशिया फिरण्याची संधी देत आहे. जर तुम्हीही व्हिएतनाम आणि कंबोडियासारख्या ठिकाणांना भेट देण्याच्या विचारात असाल तर  IRCTCच्या स्पेशल टूर पॅकेजबाबत नक्की जाणून घ्या.

3 देशांमध्ये फिरण्याची सुवर्णसंधी

IRCTCच्या या टूरचं नाव हेरिटेज साउथ ईस्ट आशिया एक्स चेन्नई असं आहे. ज्यामध्ये तुम्हाला कंबोडिया, व्हिएतनाम आणि लाओस या ठिकाणांना भेटण्याची संधी मिळणार आहे. या ट्रिपची सुरुवात चेन्नईपासून होणार असून ही ट्रिप 13 फेब्रुवारी 2019पासून सुरू होणार आहे. 8 दिवस आणि 7 रात्रींच्या या टूर पॅकेजमध्ये सिंगापूर एयरलाइन्सने येण्या-जाण्याचं तिकीट, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर म्हणजेच तीन वेळच्या जेवणाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एक रात्र क्रूजवर राहणं आणि साइटसीइंगचाही खर्च समाविष्ट आहे. 

1 लाख 30 हजार रूपयांमध्ये 8 दिवस फिरण्याची संधी

टूर पॅकेजच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर तुम्ही तुमच्या तीन मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत जाण्याचा विचार करत असाल तर ट्रिपल ऑक्यूपेंसीमध्ये प्रति व्यक्ती 1 लाख 29 हजार 500 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच डबल ऑक्यूपेंसी म्हणजेच जर 2 जणं टूर प्लॅन करत असाल तर प्रति व्यक्ति खर्च 1 लाख 30 हजार रूपये आणि सिंगल ऑक्यूपेंसीवर 1 लाख 43 हजार रुपये इतका खर्च येणार आहे. 

साउथ ईस्ट आशियाच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कंबोडियामध्ये असलेल्या रिसॉर्ट टाउन सियाम रीप (Siem Reap) मध्ये दोन रात्रींसाठी राहण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यानंतर लाओसची राजधानी लुआंग प्रबांगमध्ये 2 रात्रींसाठी राहण्याची संधी मिळणार आहे. एवढचं नाही तर एका रात्री साठी हॅलॉन्ग बे क्रूजवर आणि 2 रात्री व्हिएतनामची राजधानी हनोई सिटीमध्ये राहायला मिळणार आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन