शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वेटिंग तिकिट रद्द केल्यास परतावा आयआरसीटीसीकडून कसा मिळवावा? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 19:05 IST

तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही वेटिंग ट्रेनचे तिकीट रद्द केले, तर तुम्हाला किती रिफंड मिळेल? कदाचित नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याबद्दल आज सांगणार आहोत.

जेव्हापण चांगल्या प्रवासाचा प्रश्न येतो, तेव्हा बहुतेकजण भारतीय रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे दररोज मोठ्या प्रमाणात गाड्या चालवते. ट्रेन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाते आणि लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी लांबचा प्रवास करते. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेक प्रकारच्या सुविधाही उपलब्ध आहेत. ट्रेनमध्ये आरामदायी आसने, झोपण्याची व्यवस्था, खानपान सुविधा आणि शौचालये देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात.

त्याच वेळी, जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला आगाऊ तिकीट बुक करावे लागते, कारण अनेक मार्गांवर ट्रेनची तिकिटे त्वरित उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत अनेकवेळा लोकांना वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही वेटिंग ट्रेनचे तिकीट रद्द केले, तर तुम्हाला किती रिफंड मिळेल? कदाचित नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याबद्दल आज सांगणार आहोत.

कसा मिळवायचा वेटिंग ट्रेन तिकिटाचा परतावावास्तविक, रेल्वे तिकीट विक्रीपासून ते रद्द करण्यापर्यंतचे नियम भारतीय रेल्वेने आधीच ठरवले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तिकीट रद्द केले, तर अनेक परिस्थितींमध्ये तुम्हाला रद्दीकरण शुल्क भरावे लागते.

वेटिंग किंवा RAC वर किती परतावा?तुम्ही वेटिंग किंवा आरएसी तिकीट बुक करत असल्यास आणि नंतर कोणत्याही कारणास्तव ते रद्द करू इच्छित असल्यास, तुम्ही तसे करू शकता. यासाठी तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी स्लीपर क्लासचे तिकीट रद्द करू शकता. या प्रकरणात, तुम्हाला 60 रुपये रद्दीकरण शुल्क भरावे लागेल.

त्याच वेळी, जर तुम्ही कोणत्याही एसी क्लासचे वेटिंग तिकीट रद्द केले, तर त्यासाठी तुम्हाला 65 रुपये द्यावे लागतील आणि तुमचे उर्वरित पैसे तुम्हाला परत केले जातील.

अशा प्रकारे मिळतो ऑनलाइन तिकिटाचा परतावाजर तुम्ही वेटिंग ट्रेनचे तिकीट बुक केले असेल, तर तुम्हाला रिफंड मिळवण्यासाठी आधी ते वेळेवर रद्द करावे लागेल. 2-3 दिवसात, परतावा तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल. यादरम्यान तुम्हाला काही अडचण आल्यास, तुम्ही 0755 661 0661 या क्रमांकावर कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता.

जाणून घ्या काउंटर तिकिटाबद्दल देखीलत्याच वेळी, जर तुम्ही काउंटरवरून वेटिंग ट्रेनचे तिकीट घेतले, तर तुम्हाला रिफंड मिळवण्यासाठी ट्रेनच्या तिकीट काउंटरवर जावे लागेल. येथून वेळेवर तिकीट रद्द केल्यास तुम्हाला परतावा मिळेल.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIRCTCआयआरसीटीसी