शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Travel News: पॅरिसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर अवघ्या १० मिनिटात झाला ६ मीटर अधिक उंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:04 IST

पॅरीसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर मंगळवारी अवघ्या १० मिनिटात ६ मीटर अधिक उंच झाला आहे. या टॉवरची उंची १९.६९ फुटांनी वाढली असून आता तो ३३० मीटर उंच झाला आहे.

जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि लाखो पर्यटक आवर्जून ज्याला भेट देतात असा पॅरीसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर मंगळवारी अवघ्या १० मिनिटात ६ मीटर अधिक उंच झाला आहे. या टॉवरची उंची १९.६९ फुटांनी वाढली असून आता तो ३३० मीटर उंच झाला आहे. या उंची वाढीसाठी कारणीभूत आहे एक रेडीओ अँटेना. हेलीकॉप्टरच्या सहाय्याने ही अँटेना आयफेल टॉवरच्या डोक्यावर बसविली गेली.

आयफेल टॉवर १९२९ पर्यंत जगातील मानवनिर्मित सर्वात उंच संरचना म्हणून ओळखला जात होता. १९ व्या शतकाच्या अखेरीस गुस्ताव आयफेल यांनी हा टॉवर कागदावर आकडेमोड करून बनविला होता. त्यावेळी त्यांची नोंद जगातील सर्वात उंच मानवनिर्मित मनोरा अशी झाली होती. ४० वर्षे ही ओळख कायम राहिली होती. मात्र त्यानंतर १९२९ मध्ये न्यूयॉर्क क्रिसलर इमारत उभी राहिली आणि आयफेलचा हा ताज हिरावला गेला.

हा लोखंडी जाळीदार मनोरा जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटनस्थळ आहेच पण १०० वर्षाहून अधिक काळ याचा उपयोग प्रसारणासाठी सुद्धा केला जात आहे. त्यामुळे वेळोवेळी आयफेलच्या शिखराची उंची बदलती राहिली आहे. जुने अँटेना बदलून नवा अँटेना बसविल्यामुळे या वेळी आयफेलची उंची ६ मीटर वाढली असे सांगितले जात आहे. या कामासाठी  फक्त १० मिनिटे लागली असे समजते.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटकेParisपॅरिस