जेव्हाही कुणी कुठे फिरायला जातात तेव्हा सामान्यपणे अशा ठिकाणांवर जातात ज्या ठिकाणांबाबत त्यांनी खूप चर्चा ऐकली असेल किंवा कुणीतरी सजेस्ट केलेलं असेल. पण फिरण्यादरम्यान नव्या ठिकाणांना भेट देण्याची एक वेगळीच मजा असते. तिथे गेल्यावर असं जाणवतं की, 'हे किती भारी आहे' किंवा 'याबाबत फार कधी कुणी काही सांगितलं नाही'.
गोवा म्हटलं की, सर्वांना केवळ सुंदर समुद्र किनारे बघणे हेच लक्षात येतं. पण गोव्यात समुद्र किनाऱ्यांशिवायही खूपकाही बघण्यासारखं आहे. जर गोव्याला जाणार असाल तर यावेळी दक्षिण गोव्यातील साळावली डॅमला आवर्जून भेट द्या. कारण हे फारच सुंदर ठिकाण आहे. असंही होऊ शकतं या सुंदरतेसमोर तुम्हाला समुद्राची सुंदरताही फिकी वाटेल.
साळावली डॅम इंजिनिअरचा एक चमत्कार आहे. हा डॅम झुआरी नदीची उपनदी साळावली नदीवर तयार करण्यात आला आहे. या नदीच्या नावावरच या डॅमचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे सुंदर ठिकाणा शहरापासून साधारण ५ किमी अंतरावर आहे. इथे तुम्ही अनेक आउटडोर गेम्सचाही आनंद घेऊ शकता.
सोबतच इथे बोटींगसह वेगवेगळ्या वॉटर गेम्सचाही आनंद घेता येऊ शकतो. साळावली डॅमवर वेळ घालवणे तुमच्यासाठी फार आनंददायी ठरेल. या डॅमच्या अनेक खासियत आहेत.
हा डॅम २४ किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. सुरूवातीला याचा विस्तार एक अर्ध वृत्ताकार आउटलेटसारखा होता. यामुळे पाणी वेगाने खालच्या दिशेने पडायचं. हा डॅम जवळपास १४० फूट उंचीवर तयार केला आहे. याचं डिझाइन फारच आकर्षक आहे. इथे फोटोग्राफीचाही वेगळाच अनुभव घेता येईल.
या डॅमची आणखी एक खासियत म्हणजे दुसऱ्या बाजूला असलेलं बॉटनिकल गार्डन. हे गार्डन पिकनिकसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. याचं डिझाइन म्हैसूरच्या वृंदावन गार्डनसारखं करण्यात आलं आहे.
साळावली डॅमच्या बॅकवॉटर स्पॉट्सवर तुम्ही बर्डवॉचिंगचा आनंद घेऊ शकता. इथे वेगवेगळ्या पक्ष्यांना बघितलं जाऊ शकतं.
या गोष्टींही जाणून घ्या
१) हा डॅम बघण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती केवळ २० रूपये तिकिट लागेल.
२) इथे तुम्ही सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फिरू शकता. सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त वेळ इथे एन्जॉय करू शकाल.
३) इथे जात असताना सोबत खाण्याच्या वस्तू घ्याव्या. कारण येथील कॅन्टीनमध्ये केवळ ज्यूस आणि आयस्क्रीम मिळतं.