भारतात अनेक ठिकाणी बीचवर फिरायला जायला तुम्हाला आवडत असेल. पण त्या आधी भारतातील कोणते बीच चांगले आहेत . कोणते घाणेरडे आहेत. हे समजणं सुद्धा तितकंच गरचेचं आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला भारतातील चांगल्या आणि अस्वच्छ असलेल्या दोन्ही बीचची माहिती देणार आहोत.
केरळमधिल कझाकुट्टम बीच हा भारतातील सगळ्यात जास्त स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे.
ओडिशाचा पुरी बीच हा सुद्धा स्वच्छ आहे. समुद्रकिनारी मजा घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता.
गोपालपुर बीच, ओडिशाच्या बेरहमपुर येथुन १६ किमी अंतरावर असलेला हा बीच सगळ्यात स्वच्छ असलेल्या बीचपैकी एक आहे.
गुजरातमधील सुरत शहरातील डुमस बीचची गणती सगळ्यात सुंदर आणि रॉमॅंन्टिक बीचमध्ये होते. हा बीच जितका चांगला आहे. तेवढाच भयावह सुद्धा आहे.
महाराष्ट्रातील सुद्धा अनेक बीच असे आहेत जे स्वच्छतेच्या बाबतीत खूपचं मागे आहेत. सागरेश्वर बीच हा खूपच घाणेरड्या अवस्थेत आहे.
मुंबईतीलजवळ असलेल्या वसईत असलेला अर्नाळा बीच हा सगळयात घाण असवस्था असलेल्या बीचपैकी एक आहे. ( हे पण वाचा-आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल...)
भारतातील सगळ्यात अस्वच्छ असलेल्या बीचमध्ये तामीळनाडूतील वेदरण्यम बीच चौथ्या क्रमांकावर आहे. जर बीचचा आनंद घ्यायला जात असलेल्या पर्यटकांनी स्वच्छतेचे भान राखले तर कदाचीत हे बीच पुन्हा चांगले आणि पर्यटनास योग्य ठरू शकतात. ( हे पण वाचा-काचेचा पूल बघण्यासाठी चीन कशाला, भारतातीलच 'या' शहराला द्या भेट!)