(Image Credit : Modern Diplomacy)
तुम्ही नेपाळमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हीच योग्य वेळ ठरेल. कारण नेपाळमध्ये फेस्टिव्हल ऑफ इंडियाला सुरूवात झाली आहे. नेपाळमध्ये फिरण्यासोबतच तुम्ही या फेस्टिव्हलमध्येही सहभाग घेऊ शकता. हा फेस्टिव्हल १९ फेब्रवारीपासून सुरू झाला असून २१ मार्चपर्यंत चालणार आहे.
फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा उद्देश नेपाळच्या नव्या पिढीला भारत आणि नेपाळमधील समानतेबाबत माहिती देणे हा आहे. फेस्टिव्हलची सुरूवात भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित एका संगीत नाटकाने झाली. इथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून स्थानिक पदार्थांचीही चव चाखायला मिळणार आहे.
इथेही फिरा
म्हणायला तर नेपाळ भलेही दुसरा देश आहे, पण इथे तुम्हाला भारतात असल्यासारखेच वाटेल. नेपाळ हे फार पूर्वीपासून पर्यटकांच्या लोकप्रिय डेस्टिनेशनपैकी एक आहे. उंचच डोंगर आणि चायनीज पदार्थांसोबतच नेपाळ अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठीही ओळखलं जातं. इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत, ज्यात पोखरा, पाटन, मुक्तीनाथ आणि शक्तीनाथ मंदिर, काठमांडू तसेच लुंबिनी आहे. पोखरा हे गेटवे ऑफ अन्नपूर्णा सर्किट म्हणून लोकप्रिय आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडींगपासून ते इतरही अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.
नगरकोट आणि सागरमठही आकर्षक
पोखरा व्यतिरिक्त नेपाळचं नगरकोट हिल स्टेशन सुद्धा पर्यटकांसाठी आकर्षण ठरतं. इथून हिमालयातील डोंगरांचा सुंदर नजारा बघायला मिळतो. तसेच तुम्ही येथील सागरमाथा नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. हिमालयाच्या डोंगरांमध्ये स्थित हा नॅशनल पार्क जगातल्या सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टजवळ आहे. इथे आल्यावर तुम्हाला माउंट एव्हरेस्टची सैर केल्याचाही अनुभव येईल.