या रहस्यमयी बेटावर फक्त वर्षातुन एकदा जाण्याची परवानगी, कारण आहे धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 03:31 PM2022-05-22T15:31:04+5:302022-05-22T15:33:33+5:30

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकांना वर्षातून फक्त एक दिवस येथे जाण्याची परवानगी आहे. उर्वरित 364 दिवस या बेटावर जाणे शक्य नाही.

eynhallow island in Scotland only one day in year allow to go | या रहस्यमयी बेटावर फक्त वर्षातुन एकदा जाण्याची परवानगी, कारण आहे धक्कादायक

या रहस्यमयी बेटावर फक्त वर्षातुन एकदा जाण्याची परवानगी, कारण आहे धक्कादायक

Next

या जगात अशी बरीच बेटे आहेत, जी रहस्येने परिपूर्ण आहेत. असेच एक बेट स्कॉटलंडमध्येही आहे, जे आयनहॅलो बेट म्हणून ओळखले जाते. हृदयाच्या आकाराचे हे बेट अतिशय सुंदर आहे, परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकांना वर्षातून फक्त एक दिवस येथे जाण्याची परवानगी आहे. उर्वरित 364 दिवस या बेटावर जाणे शक्य नाही.

हे बेट इतके लहान आहे की नकाशावर सापडणे फार कठीण आहे. या बेटाबद्दल बर्‍याच रहस्यमय कथा देखील आहेत. पौराणिक कथेनुसार, आयनहॅलो या बेटावर भूत-प्रेतात्मांचा वावर आहे. दंतकथेनुसार, या बेटावर दुष्ट आत्म्यांचा ताबा आहे. जर कोणी या बेटावर येण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते प्रेतात्मे हे बेट हवेतच नाहीसे करतात. असेही म्हटले जाते की उन्हाळ्याच्या हंगामात या बेटावर जलपऱ्या आहेत, ज्या गर्मीच्या काळात पाण्यामधून बाहेर पडतात.

स्कॉटलंडच्या हायलँड्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॅन ली यांच्या म्हणण्यानुसार हजारो वर्षांपूर्वी या बेटावर लोक वास्तव्य करीत होते, परंतु 1851 मध्ये येथे प्लेग रोग पसरला आणि त्यामुळे तेथील रहिवासी बेट सोडून गेले. आता हे बेट पूर्णपणे निर्जन आहे. बर्‍याच जुन्या इमारतींचा अवशेष येथे सापडले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते येथे उत्खननात अनेक दगडी पाषण भिंतीही सापडल्या आहेत.

हे बेट कधी बनले याची कोणालाही माहिती नाही. पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणतात की हे एक संशोधन स्थळ आहे. यावर संशोधन केल्यास इतिहासाची अशी अनेक रहस्ये समोर येतील, ज्यामुळे लोक चकित होतील. आयनहॅलो बेट ऑर्कने बेटापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे, जिथे लोक राहतात, परंतु असे असूनही आयनहॅलो बेटावर जाणे सोपे नाही. अगदी बोटीनेही येथपर्यंत पोहोचणे शक्य नाही, कारण इथून वाहणाऱ्या नद्यांमध्ये इतका भरतीचा कडा पडला आहे की ते मार्ग बंद करतात.

Web Title: eynhallow island in Scotland only one day in year allow to go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.