शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

तुमच्याकडे भारताचा पासपोर्ट आहे?; मग, 'या' ४७ देशांमध्ये जायला व्हिसाची गरज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 17:03 IST

'पॉवरफुल्ल पासपोर्ट्स'च्या यादीत जपानचा पासपोर्ट अव्वल स्थानी आहे.

ठळक मुद्देआपल्या देशाच्या पासपोर्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती महत्त्व आहे, यावरही अनेक देशांची दारं उघडणं अवलंबून असतं.भारताचा पासपोर्ट सध्या ८४व्या क्रमांकावर आहे.

कामानिमित्त किंवा भटकंतीसाठी परदेशात जायचं असेल तर पासपोर्टशिवाय पुढे जाऊ शकत नाही. पण, फक्त पासपोर्ट असला की आपला परदेशवारीचा मार्ग सुकर होतो असंही नाही. आपल्या देशाच्या पासपोर्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती महत्त्व आहे, तो किती ताकदीचा आहे, यावरही अनेक देशांची दारं उघडणं अवलंबून असतं. या 'पॉवरफुल्ल पासपोर्ट्स'च्या यादीत जपानचा पासपोर्ट अव्वल स्थानी आहे. जपानी पासपोर्टधारक जगातील १९१ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. जपान पाठोपाठ सिंगापूर, जर्मनी, दक्षिण कोरिया या देशांचे पासपोर्टही बलशाली आहेत. 

भारताचा पासपोर्ट सध्या ८४व्या क्रमांकावर आहे. आपलं स्थान दोन क्रमांकानी घसरलंय. या रँकिंगच्या आधारे जगातील ४७ देश भारतीय पासपोर्टधारकांना व्हिसा-फ्री प्रवेश देणार आहेत. तर, ११ देशांची दारं आपल्यासाठी ई-व्हिसानेही उघडू शकतात. अशा एकंदर ५८ देशांची यादी आपण पाहू याः 

व्हिसा-फ्री एन्ट्री असलेले देशः

भूतानडॉमिनिकाइक्वाडोरअल साल्वेडोरफिजीग्रेनाडाहैतीजमैकामॉरिशसमायक्रोनेशियानेपाळसेन्ट किट्स अँड नेव्हिससेन्ट व्हिन्सेंट अँड द ग्रेनाडिन्ससामोआ (परमिट ऑन अरायव्हल आवश्यक) सेनेगलसीशेल्सश्रीलंका (विशेष परमिट आवश्यक)त्रिनिदाद अँड टोबॅगोव्हॅनआटूअन्टार्क्टिकाFYRO मॅसेडोनियास्व्हॅलबर्डमॉन्सेरात

बेस्ट न्यूड बीच...जिथे कपड्यांविनाच समुद्र आणि वाळूचा आनंद घेतात लोक!

भूतानमध्ये कमीतकमी खर्चात सुट्टी इन्जॉय करण्याची संधी, IRCTC ने लॉन्ज केलय खास पॅकेज

व्हिसा ऑन अरायव्हल

बोलिव्हियाकंबोडियाकेप वर्देकोमोरोसजिबौटीइथियोपिआजिनिया-बिसाऊगयानाइंडोनेशियाजॉर्डनलाओसमादागास्करमालदिव्समॉरिटानियापलाऊसेन्ट लुसियासोमालियाटान्झानियाथायलंडटोगोटिमोर-लेस्टेटुवालूयुगांडाटर्क्स अँड कैकोस

परदेशात फिरण्यासाठी जायचयं? तर 'हे' खास पॅकेज नक्की बघा

हे आहे जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर, यात अनेक आश्चर्यकारक गोष्टींची होत असते चर्चा

ई-व्हिसा लागणारे देश

बहारिनआयव्हरी कोस्टगॅबॉनजॉर्जियाकेनियामोलडोव्हाम्यानमाररवांडासाओ टोम अँड प्रिन्सिपेझांबियाझिम्बाब्वे

त्याशिवाय, भारतीय पासपोर्टधारकांना मलेशियाचा १५ दिवसांचा व्हिसा मोफत मिळू शकतो. तसंच, यूएईनं सर्व देशांतील नागरिकांना पाच वर्षांचा टुरिस्ट व्हिसा देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. 

व्हिसाविना प्रवेश देणाऱ्या देशांमध्ये जायचा प्लॅन करत असाल, तर आपल्या पासपोर्टची व्हॅलिडिटी तपासून घ्या. तो  किमान सहा महिने ग्राह्य असायला हवा. तसंच, 'व्हिसा ऑन अरायव्हल' असलेल्या देशांमध्ये जाताना पासपोर्ट साईज फोटो, परतीच्या प्रवासाचं कन्फर्म तिकीट, व्हिसा पेमेंट फी आणि व्हिसा अॅप्लिकेशन फॉर्म सोबत बाळगायला विसरू नका. 

टॅग्स :tourismपर्यटनpassportपासपोर्टVisaव्हिसाNepalनेपाळSri Lankaश्रीलंका