बेस्ट न्यूड बीच...जिथे कपड्यांविनाच समुद्र आणि वाळूचा आनंद घेतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:41 PM2020-01-08T12:41:35+5:302020-01-08T12:58:18+5:30

जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी न्यूड बीचेस आहेत, इथे असे लोक जातात ज्यांना बिकिनी किंवा शॉर्ट्स घालून एन्जॉय करणं आवडत नाही. आणि ते कपड्यांविनाच येथील समुद्रात-रेतीवर एन्जॉय करतात. अशा एखाद्या ठिकाणी जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर जगाभरातील काही बीचेसची माहिती देत आहोत. (Image Credit : Social Media)

एलिया बीच - मिकोनोस, ग्रीस - एलिया बीच या आयलॅंडवर सर्वात लांब बीच आहे. येथील ब्राऊन रंगाची वाळू आणि किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांची मजा काही औरच आहे. हा बीच खासकरून एलजीबीटी कम्युनिटी लोकांमध्ये अधिक फेमस आहे. इथे एक भाग महिलांसाठी तर एक भाग पुरूषांसाठी वेगळा करण्यात आला आहे. दोन्ही साइडने लोक खुर्च्या लावून विना कपड्यांनी तिथे सनबाथचा आनंद घेऊ शकतात. (Image Credit : visitgreece.gr)

लिटिल बीच - माउ, हवाई - हवाईतील हा बीच तसा तर सगळ्या प्रकारच्या पर्यटकांना आकर्षित करतो. पण इथे अशा लोकांना जास्त पाहिलं जातं जे स्वत:ला निसर्गाच्या अधिक जवळ जाणं पसंत करतात. स्वत:ला निसर्गाचा एक भाग मानत हे लोक कपड्यांशिवाय फिरतात आणि बोन फायरपासून ते डान्सचा आनंद घेताना दिसतात. (Image Credit : priyooktaviano.com)

Cap d'Agde बीच: फ्रान्स - फ्रान्सचा हा बीच जगातला सर्वात बेस्ट न्यूड बीचपैकी एक मानला जातो. याला नेचरिस्ट बीच आणि नेकेड व्हिलेज असंही म्हटलं जातं. इथे जास्तीत जास्त लोक विना कपड्याचे दिसतात. इतकेच काय तर इथे लोक विना कपड्याने शॉपिंग करतानाही दिसतात. (Image Credit : southfrancevillas.com)

Platja des Cavallet बीच: इबिजा, स्पेन - स्पेनमधील हा बीच ऑफिशिअली न्यूड बीच मानला जातो. या बीचवर पर्यटकांना तीन भागांमध्ये विभागण्यात येतं. एका भागात फॅमिली, दुसऱ्यात एलजीबीटी आणि मधल्या भागात असे लोक असतात जे न्यूड असतात. (Image Credit : ibiza-spotlight.com)

Mpenjati बीच: दक्षिण आफ्रिका - दक्षिण आफ्रिकेतील या बीचवर तरूणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत विना कपड्याने सनबाथ घेताना दिसतात. समुद्रात खेळताना दिसतात. या बीचला २०१४ पासून अधिकृतपणे न्यूड बीट म्हणून घोषित केलं आहे. (Image Credit : 2oceansvibe.com)

Spiaggia di Guvano बीच: इटली - इटलीमधील हा बीच सुंदर तर आहेच, पण सोबतच हा बीच न्यूड बीच म्हणूनही अधिक लोकप्रिय आहे. इथे ज्यांना मुक्त होऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो ते अधिक येतात. (Image Credit : flickr.com)