(Image Credit : wikipedia.org)
सामान्यपणे उन्हाळ्यात थंड असलेल्या शहरात लोक फिरायला जातात. पण काही लोक असेही असतात जे थंडीच्या ठिकाणी हिवाळ्यातही फिरायला जातात. त्यांना वेगळा, भन्नाट अनुभव घ्यायचा असतो. तुम्हाही हिवाळ्यात सर्वात थंड ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही भारतातील सर्वात थंड ठिकाणाला भेट द्या. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आणि भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाणाची माहिती देणार आहोत.
जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे द्रास
जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात एक छोटसं गाव द्रास आहे. या ठिकाणाबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. पण हे जगातलं सर्वात थंड दुसरं ठिकाण आहे. पहिल्या क्रमांकावर रशियातील ओइमाकॉन जो हे छोटं शहर आहे. द्रासमध्ये तापमान -२० डिग्रीपर्यंत पोहोचतं. याने मेंदूच्या नसाही गोठल्या जातात.
गेट वे ऑफ लडाख
द्रास या ठिकाणाला गेटवे ऑफ लडाख असंही म्हटलं जातं. इथे अनेक हॉटेल्स असून तिथे राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे. पण जास्त लोक इथे रात्री थांबत नाही. कारण इथे रात्री गोठवणारी थंडी असते. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान द्रास येथील तापमान २३ डिग्रीच्या आसपास राहतं. त्यामुळे या वातावरणात तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता.
कारगिल वॉर मेमोरिअल
हे ठिकाण प्रसिद्ध असण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथे तयार करण्यात आलेलं कारगिल वॉर मेमोरिअल. याला द्रास वॉर मेमोरिअल असंही म्हटलं जातं. हे मेमोरिअल तोलोलिंग डोंगरामध्ये इंडियन आर्मीने तयार केलं. १९९९ मध्ये तयार करण्यात आलेल्या या मेमोरिअलचा उद्देश भारत-पाक कारगिल युद्धातील शहीद भारतीय सैनिकांना मानवंदना देणं हा आहे.
जोजिला पास
इथे फिरायला येणाऱ्या लोकांसाठी फिरण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. कारगिल वॉर मेमोरिअलसोबतच येथील जोजिला पासही बघण्यासारखं आहे. इथे साहसी प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात. लडाखला काश्मीरशी जोडणाऱ्या या भागातील रस्त्यांवर वेगळ्या अनुभवासाठी लोक इथे येतात.
सुरू व्हॅली ट्रॅक
येथील डोंगराळ रस्त्यांवर ट्रेकिंगचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. सुरू व्हॅलीहून द्रासपर्यंतचा ट्रेकिंगचा रोमांचक प्रवास तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. डोंगरावर पसरलेली बर्फाची सुंदर चादर तुम्हीही कधीही विसरू शकणार नाही.