शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राजघराण्यातील कुणीही या प्राचीन मंदिरात पुजा केली तर होऊ शकतो मृत्यू, आहे भयानक शाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 15:45 IST

नेपाळची राजधानी काठमांडू पासून ८ किमी असलेले एक अतिप्राचीन रहस्यमयी मंदिर, ‘बुदानीकंथा’ नावाने ओळखले जाते आणि वेगळ्याच कारणाने ते चर्चेत असते.

भारताप्रमाणे जगात अन्य देशात सुद्धा अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन हिंदू मंदिरे आहेत. आपला शेजारी देश नेपाळ हे तर हिंदू राष्ट्र म्हणूनच ओळखले जाते. नेपाळ मध्येही अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरे आहेत आणि हजारो भारतीय या मंदिरांना दर्शनासाठी दरवर्षी भेट देतात. नेपाळची राजधानी काठमांडू पासून ८ किमी असलेले एक अतिप्राचीन रहस्यमयी मंदिर, ‘बुदानीकंथा’ नावाने ओळखले जाते आणि वेगळ्याच कारणाने ते चर्चेत असते. या मंदिरात कुणीही सर्वसामान्य भाविक पूजा अर्चा करू शकतात पण असे म्हणतात कि नेपाळच्या राजघराण्यातील कुणी येथे पूजा केली तर त्याचा मृत्यू होतो. नेपाळ राजघराण्याला हा शाप आहे असे सांगितले जाते. त्यामुळे राजघराण्यातील कुणीही येथे पूजा करण्यास धजावत नाहीत.

शिवपुरी पहाडात असलेले हे प्राचीन मंदिर भगवान विष्णूचे आहे. एका शेतकऱ्याला या मंदिराचा शोध लागला असे सांगितले जाते. या मंदिरात पाण्याचे मोठे कुंड असून त्यात विष्णूची ११ सर्पांच्या वेटोळ्यावर निद्रा घेत असलेली प्रचंड मोठी मूर्ती आहे. विष्णूच्या मस्तकावर नागाच्या फडा आहेत. हे कुंड किंवा तलाव १३ मीटर लांबीचा असून त्यात ५ मीटर लांबीची ही शयनमुद्रेतील मूर्ती आहे. मूर्ती काळ्या रंगाची आहे.

नेपाळ राजपरिवार या मूर्तीची पूजा करू शकत नाही म्हणून अशीच दुसरी मूर्ती येथे स्थापित केली गेली असून त्या मूर्तीची राजघराण्यातील लोक पूजा करतात. या मंदिरात शंकर मूर्ती सुद्धा आहे. असे सांगतात कि समुद्र मंथन केल्यावर त्यातून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन केले आणि त्यामुळे त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. तेव्हा त्यांनी त्रिशुळाने वार करून निर्माण केलेल्या पाण्याने तहान भागविली आणि त्यांची जळजळ कमी झाली. त्या पाण्याचे  हे सरोवर बनले. गोसाईकुंड असे या सरोवराचे नाव आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात येथे शिव महोत्सव होतो तेव्हा कुंडात खाली असलेल्या शंकराच्या मूर्तीचे दर्शन होते असे सांगतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके