परदेशात जाऊन स्वस्तात मस्त एन्जॉय करायचं असेल तर थायलॅंड तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन ठरू शकतं. थायलॅंड म्हटलं की, सर्वांच्या डोक्यात केवळ बॅंकॉक येतं. पण थायलॅंड बॅंकॉक व्यतिरीक्तही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करू शकता. अशाच थायलॅंडमधील पाच शहरांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
कोह समुई
थायलॅंडमधील सर्वात रोमॅंटिक हनीमून डेस्टिनेशनपैकी एक ठिकाण म्हणजे कोह समुई. हे ठिकाण पार्टी आणि फूल मून पार्टीजसाठी चांगलंच लोकप्रिय आहे. कोह समुईमध्ये सर्वात मोठ्या बीच पार्टींचं आयोजन केलं जातं. या पार्टीज रात्रभर चालतात. इथे तुम्ही रात्रभर तुमच्या मित्रांसोबत किंवा पार्टनरसोबत एन्जॉय करू शकता. तसेच इथे तुम्ही काही सुंदर बौद्ध विहारांना भेट देऊ शकता आणि आंग थोंग नॅशनल मरीन पार्कमध्येही एन्जॉय करू शकता.
फुकेत
फुकेत हे सुद्धा थायलॅंडमधील सर्वात रोमॅंटिक ठिकाणांपैकी एक आहे. क्रिस्टलसारखं स्वच्छ आणि चमकतं पाण्याच्या समुद्र किनाऱ्यावर दूरदूरपर्यंत पसरलेली ताडाची झाडे डोळ्यांना वेगळाच आनंद देतात. येथील हवेतच रोमान्स आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. खास बाब ही आहे की, फुकेतमध्ये राहणे अजिबात महाग नाही. इथे तुम्ही आरामात २ ते ३ दिवस घालवू शकता. इथे तुम्ही स्पा चा आनंदही घेऊ शकता. तसेच जवळच असलेल्या ४ आयलॅंडवरही फिरायला जाता येऊ शकतं. स्कूबा डायव्हिंगचाही तुम्ही आनंद घेऊ शकता.
क्राबी
क्राबी हे सुद्धा थायलॅंडमधील एक लोकप्रिय आणि सुंदर डेस्टिनेशन आहे. क्राबी हे १३० निर्जन आणि शांत द्वीपांचा समूह आहे. त्यामुळे इथे निर्सगाचा एक वेगळाच नजारा तुम्हाला बघायला मिळतो. नैसर्गिक गुहा, स्वच्छ समुद्र पाणी, हिरवीगार झाडे हे असं मनमोहक दृश्य इथे बघायला मिळतं. येथील समुद्र किनाऱ्यावर कॅंडल लाइट डिनर करणे एक अविस्मरणिय अनुभव ठरू शकतो.
चियांग माई
चियांग माई एक असं शहर आहे जिथे केवळ नैसर्गिक सौंदर्याचंच जतन केलं नाही तर येथील आदिवासी गावांतील संस्कृतीही जिंवत ठेवली आहे. कपल्ससाठी थायलॅंडमधील हे ठिकाण सर्वात परफेक्ट म्हणता येईल. सुंदर डोंगरांच्या सहवासात तुम्ही इथे २ ते ३ दिवस आरामात वेळ घालवू शकता. इथे आल्यावर दोई इंटन नॅशनल पार्क आणि वियांग कुम काम इथे जायला विसरू नका.
हुआ हिन
कमी बजेटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही हुआ हिन शहराला भेट देऊ शकता. अनेक बीच, रिसॉर्ट्स या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. इथे फार कमी पैशांमध्ये तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. इथे तुम्ही सॅम रूई यॉट नॅशनल पार्क, सॅंडस्टोन गुहाही बघू शकता. २ ते ३ दिवस तुम्ही इथे चांगला वेळ घालवू शकता.