शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

विमेन ओन्ली तिच्या सहलीच्या नियोजनाचा उत्तम पर्याय

By admin | Updated: April 25, 2017 17:58 IST

आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार जर ट्रीप प्लॅन करायची असेल ‘विमेन ओन्ली’ ट्रॅव्हल पोर्टलचा चांगला आॅप्शन उपलब्ध आहे.

- अमृता कदमआपलं रोजचं रूटिन काम, मुलं, घर, नाती गोती यांसारख्या जबाबदाऱ्यातून स्वत:साठी थोडा वेळ काढावा आणि अगदी फक्त आपणच आपल्यासोबत असावं, असं अनेक गृहिणींना वाटत असतं. अगदी एकट्यानंच किंवा आपल्या खास मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी मग प्रवासाचं नियोजन केलं जातं. आजकाल अनेक ट्रॅव्हल कंपन्या फक्त महिलांसाठीच्या ट्रीप अरेंज करतात. पण ट्रॅव्हल कंपनीसोबत न जाता स्वत:च्या आवडीची स्थळं निवडून, आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार जर ट्रीप प्लॅन करायची असेल ‘विमेन ओन्ली’ ट्रॅव्हल पोर्टलचा चांगला आॅप्शन उपलब्ध आहे. केवळ मुली आणि महिलांसाठी कस्टमाइज्ड किंवा ग्रूप ट्रीप प्लॅन करण्यासाठी तुम्हाला या पोर्टलचा चांगला उपयोग होऊ शकतो.

 

वॉव क्लब (Women on Wanderlust)

ट्रेंड मध्ये असलेला एक ‘विमेन ओन्ली’ क्लब. ही कल्पना सुचली सुमित्रा सेनापतीला. स्वत:ला ‘भटक्या संप्रदाया’ची समजणाऱ्या सुमित्रानं 2005 मध्ये वॉव क्लबची सुरूवात केली. हा महिलांसाठीचा एक्सक्लुझिव्ह ट्रॅव्हल क्लब ज्याचे शेकडो सभासद आहेत. ट्रेक असो की क्रूझवरची शानदार ट्रीप हा क्लब तुमच्या आवडी आणि सवडीनुसार तुमच्यासाठी ट्रीप प्लॅन करतो. भारतातल्या ठिकाणांबरोबरच उझबेकिस्तान , कॉर्सिका, ग्रीस, तुर्कस्तान अशा हटके फॉरेन डेस्टिनेशन्सच्या टूर्सही प्लॅन करतात. वॉव क्लबच्या गुलाबी रंगाच्या सुंदर वेबसाइटवर त्यांच्या वेगवेगळ्या ट्रीपचे फोटो, टूरवर गेलेल्या महिलांनी शेअर केलेले त्यांचे अनुभव, अपकमिंग टूर्स असं सगळं काही पहायला मिळतं. वॉवच्या वेबसाइटला भेट देण्यासाठी इथे https://www.wowclub.in क्लिक  करा.

जुगनी

हिमालयन एक्सप्लोअरर्स क्लबच्या नीतेशचौहान आणि रोहित खट्टर या दोन तरु ण शिलेदारांनी जुगनी या वेब पोर्टलची सुरूवात केली. महिलांना सुरक्षित प्रवासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आणि प्रवासाच्या माध्यमातून जुगनीच्या सभासदांमध्ये आयुष्याबद्दल एक नवीन पॅशन निर्माण करण्याचा ‘जुगनी’चा प्रयत्न असतो. देशा-परदेशातल्या वेगवेगळ्या ट्रीप्सचं ‘जुगनी’ आयोजन नियोजन करते. अशा ट्रीप्समध्ये आपल्यासोबत अनोळखी ग्रूप एकत्र येतात. पण जुगनी या लोकांना अनोळखी मानत नाही. त्यांच्यासाठी ही अशी मित्रमंडळी खरंतर मैत्रिणमंडळी असतात, जी यापूर्वी कधी भेटलेली नसतात इतकंच! या भावनेनं एकमेकांसोबत केलेला प्रवास नक्कीच आनंददायी असू शकतो. जुगनीला भेट देण्यासाठी इथे http://www.jugni.co.in/ क्लिक करा. विमेन आॅन क्लाउडस क्लब ‘देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या महिलांना एकत्र येण्याचं आणि नव्या मैत्रिणी मिळवण्याचं एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे’. हा या क्लबचा मोटो असून त्यांच्या फेसबुक पेजला भेट दिल्यावर तो आधी वाचायला मिळतो. अगदी शाळा-कॉलेजच्या ट्रीप्सपासून विमेन आॅन क्लाउड्स क्लब मुली आणि महिलांसाठी ट्रीप अरेंज करतात. प्रवासाच्या माध्यमातून स्वत:चाच नव्यानं शोध घेण्यावर त्यांचा विश्वास आहे. विमेन आॅन क्लाउड्स क्लबची वेबसाइट पाहण्यासाठी इथे http://www.womenonclouds.com/ करा.

 

मिस ट्रॅव्हल बीट्रॅव्हल बी स्वत:ला महिलांनी चालवलेली, महिलांचीच आणि महिलांसाठीच असलेली ‘प्रवासी आघाडी’ म्हणूनच संबोधते. वेगवेगळ्या वयोगटाच्या, वेगवेगळ्या पाशर््वभूमीच्या महिलांना सगळ्या धकाधकीतून फक्त आणि फक्त स्वत:साठीच वेळ मिळावा या उद्देशानं ट्रॅव्हल बीच्या ट्रीप्सचं नियोजन केलं जातं त्यामुळेच निवांतपणा, थोडं अडव्हेंचर, शॉपिंग, पर्यटनस्थळांची सांस्कृतिक पाशर््वभूमी, त्या स्थळांच ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ट्रॅव्हल बी तुमच्या प्रवासाचं नियोजन करते. ट्रॅव्हल बी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे http://www.mstravelbee.com/ क्लिक करा.  

बियाँड ट्रॅव्हलअविस्मरणीय सुटी आणि सुटीचा अनुभव देण्याचं आश्वासन देणाऱ्या बियॉँड ट्रॅव्हल केवळ पर्यटनस्थळांना भेट देऊन परत आणण्यापेक्षा अधिक काही देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. इथे विसरता न येणारे अनुभव आणि ते अनुभव आनंदानं उपभोगण्यासाठी साधारण सारख्याच आवडी-निवडी असलेल्या लोकांचा ग्रूप तयार करणं हे त्यांच्या प्रवासाच्या नियोजनामागचं उद्दिष्ट आहे. इथे तुम्ही खास तुमच्या स्वत:साठी खासगी किंवा कस्टमाइज्ड टूर्सही प्लॅन करु शकता. अगदी जॉर्डन, पेरु , पोर्तुगाल, इजिप्तसारखी वेगळी परदेशी पर्यटनस्थळंही बियाँड ट्रॅव्हल तुमच्यासाठी प्लॅन करु शकते. बियाँड ट्रॅव्हलची वेबसाइट पाहण्यासाठी इथे https://byond.travel क्लिक  करा. यंदाच्या सुटीमध्ये जर तुम्ही कुठे जाण्याचं ठरवलं नसेल तर या वेब पोर्टलची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता.