शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

पाण्यावर तरंगणारं अनोखं गाव, घरांपासून ते शाळांपर्यंत सगळंच पाण्यावर तरंगतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:25 IST

जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य आजही अनेकांपर्यंत पोहोचलं नाहीये. आफ्रिकेतील बेनन नदीवर वसलेलं गेनवी गाव. १७ व्या शतकात हे गाव या गावातील लोकांनी गुलामगिरीतून वाचण्यासाठी वसवलं होतं.

जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथील नैसर्गिक सौंदर्य आजही अनेकांपर्यंत पोहोचलं नाहीये. आफ्रिकेतील बेनन नदीवर वसलेलं गेनवी गाव. १७ व्या शतकात हे गाव या गावातील लोकांनी गुलामगिरीतून वाचण्यासाठी वसवलं होतं. २० हजार लोकसंख्या असलेलं हे तलावावरील गाव आफ्रिकेतील सर्वात मोठं गाव मानलं जातं. जगभरातू हे गाव बघण्यासाठी पर्यटक इथे येत असतात. 

(Image Credit: kwekudee-tripdownmemorylane.blogspot.com)

आफ्रिकेचं वेनिस म्हटल्या जाणाऱ्या या गावातील घरापासून ते हॉटेलपर्यंत सगळ्याच गोष्टी पाण्यावर तरंगताना दिसतात. काही दंतकथांनुसार, १६व्या किंवा १७ व्या शतकात आफ्रिकेतील तोफीनु समुदायाच्या लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी हे गाव वसवलं होतं. त्यावेळी फोन नावाची एक जमात या लोकांना गुलाम बनवण्यासाठी येत असत. पण आपल्या काही धार्मिक मान्यतामुळे ते पाण्यात प्रवेश करून कुणालाही बंधक करु शकत नव्हते. त्यामुळे हळूहळू या गावातील लोकांनी या गावातच जीवन शोधलं. आज हे संपूर्ण गाव एकत्र राहतं. 

(Image Credit: kwekudee-tripdownmemorylane.blogspot.com)

या गावातील घरे आणि हॉटेल्स सगळंच पाण्यात आहे. इतकेच नाही तर येथील पोस्ट ऑफिस, बॅंक, हॉस्पिटल, चर्च आणि शाळाही पाण्यावर तरंगतात. ही जमिनही या गावातील लोकांनी मिळून तयार केली आहे. १९९६ मध्ये या गावाला यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज यादीत सामिल केलं आहे. 

(Image Credit: kwekudee-tripdownmemorylane.blogspot.com)

इथे येणाऱ्या पर्यटकांना वेनिसप्रमाणे आलिशान बोट नाही मिळत पण गाव बघण्यासाठी भाड्याने होडी नक्कीच मिळते. इथे राहणाऱ्या लोकांची संस्कृती आफ्रिकेतील इतर लोकांच्या तुलनेत फार वेगळी आहे. त्यामुळे येथील संस्कृती पाहण्यासाठीही काही लोक इथे येतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयTravelप्रवास