शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
6
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
7
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
8
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
9
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
10
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
11
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
12
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
13
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
14
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
15
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
16
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
17
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
18
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
19
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
20
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 

इंग्रजी शिकवण्याच्या बदल्यात परदेशात पर्यटनाची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:08 IST

जपान, फ्रान्स, सुदान, व्हिएतनाम, तैवान य देशात आपल्याइतक्या सहजतेनं इंग्रजी बोललं जात नाही. त्यामुळेच इंग्रजी शिकवण्यासाठी या देशांत अनेक कम्युनिटी कार्यक्रमांना आणि व्यक्तींना आमंत्रित केलं जातं.

ठळक मुद्दे* या देशांच्या अशा सफारीत तुम्ही महिन्याला वीस ते चाळीस हजार रूपयेही कमवू शकता.* एरवी आपण पर्यटनाला जातो, तेव्हा तटस्थपणे प्रेक्षणीय स्थळं पाहतो आणि परत येतो. पण जेव्हा तुम्ही अशा काही उपक्र मांच्या माध्यमातून परदेशी जाता तेव्हा तिथल्या सामाजिक जीवनाशी एकरूप होण्याची संधीही मिळते.

 

- अमृता कदमआपल्या बुद्धीचा, शिक्षणाचा कसा-कुठे-कधी उपयोग होईल हे सांगता येत नाही. शिकलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही. उदाहरणार्थ तुम्हाला चांगलं इंग्लिश लिहिता-बोलता येत असेल, या भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्हाला चक्क काही देश अगदी फुकटात फिरता येतील. तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये, फक्त तिथल्या लोकांना जाऊन इंग्रजी शिकवायचं आहे. त्या बदल्यात तुम्हाला वेतन तर मिळेलच, पण त्या देशात तुमच्या निवासाची व्यवस्थाही मोफत केली जाईल.

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ही एकच अट त्यासाठी आहे. जगात अनेक देश असे आहेत, ज्यांना सध्या अशा इंग्रजी शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे ते अशा लोकांना आमंत्रित तर करतातच, पण त्यांच्या राहण्याची मोफत सोयही करतायत. शिवाय ही भाषा शिकवण्यासाठी वेतनही मिळतं.

 

आता एवढं सगळं सांगितल्यावर हे असे देश नेमके कुठले आहेत याबद्दलची तुमची उत्सुकता ताणली असेलच. तर मित्रांनो हे देश आहेत जपान, फ्रान्स, सुदान, व्हिएतनाम, तैवान हे देश. इथे आपल्याइतक्या सहजतेनं इंग्रजी बोललं जात नाही. इंग्रजी व्याकरणामध्ये या देशातील लोक भारतीयांप्रमाणे तरबेज नाहीत. त्यामुळेच इंग्रजी शिकवण्यासाठी या देशांत अनेक कम्युनिटी कार्यक्रमांना आणि व्यक्तींना आमंत्रित केलं जातं. जो कोणी इच्छुक असेल त्यांना फक्त त्या देशात जाण्यासाठीविमान तिकीटाचा खर्च उचलावा लागतो. तिथल्या शाळा, महाविद्यालयात जाऊन इंग्रजी शिकवण्या  बदल्यात राहण्याची, भोजनाची व्यवस्था हे देश अगदी मोफत करतात.ही बाब इथेच संपत नाही. या देशांच्या अशा सफारीत तुम्ही महिन्याला वीस ते चाळीस हजार रूपयेही कमवू शकता. त्यामुळे अनेकजण पर्यटनासाठी अशा अनोख्या संधीचा वापर करतात.

एरवी आपण पर्यटनाला जातो, तेव्हा तटस्थपणे प्रेक्षणीय स्थळं पाहतो आणि परत येतो. पण जेव्हा तुम्ही अशा काही उपक्र मांच्या माध्यमातून परदेशी जाता तेव्हा तिथल्या सामाजिक जीवनाशी एकरूप होण्याची संधीही तुम्हाला मिळते. जी तुम्हाला खूप काही देऊन जाते.

इंग्रजी शिक्षणाचे अनेक फायदे व्यावसायिक जीवनात पाहायला मिळतात. पण अशा पद्धतीनं आपला छंद, पर्यटनाची आवड जर ही भाषा पूर्ण करणार असेल तर मग तिच्यावर थोडी मेहनत करायला काय हरकत आहे? अनेक होतकरु तरूणांनी हे देश केवळ इंग्रजीच्या बळावर फिरु न घेतले आहेत. तुम्हीही प्रयत्न करु न बघा.