शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १२९९ रूपयांमध्ये करा हवाई सफर; ही विमान कंपनी देतेय भन्नाट ऑफर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 8, 2021 16:04 IST

प्रवाशांना मिळणार स्वस्तात प्रवास करण्याची संधी

ठळक मुद्दे 'द ग्रेट सिक्स्थ अॅनिव्हर्सरी सेल' अंतर्गत मिळणार स्वस्तात प्रवासाची संधीआज आणि उद्या प्रवाशांना तिकिट बुक करण्याची संधी

जर तुम्हाला विमान प्रवासाची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक एअर विस्तारानं आपल्या प्रवाशांसाठी एक जबसदस्त ऑफर आणली आहे. विस्तारानं प्रवाशांसाठी 'द ग्रेट सिक्स्थ अॅनिव्हर्सरी सेल'ची सुरूवात केली आहे. या अंतर्गत इकॉनॉमी क्लासमध्ये १२९९ रुपयांत देशभरात कोणत्याही ठिकाणी प्रवासाची संधी देण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रिमिअम इकॉनॉमीसाठी प्रवाशांना २०९९ रुपये आणि बिझनेस क्लासच्या तिकिटांसाठी प्रवाशांना ५९९९ रूपये मोजावे लागणार आहेत. ८ आणि ९ जानेवारी रोजी बूक करण्यात येणाऱ्या तिकिटांवरच ही ऑफर मिळणार आहे. तसंच प्रवाशांना २५ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर दरम्यान देशभरात प्रवास करता येणार आहे. 

एअर विस्ताराच्या 'द ग्रेट सिक्स्थ अॅनिव्हर्सरी सेल' अंतर्गत केवळ या दोनचं दिवसांत प्रवाशांना तिकिट आरक्षित करता येणार आहे. ८ आणि ९ जानेवारीदरम्यान बुकिंग खुलं राहणार आहे. या ऑफर अंतर्गत प्रवाशांना २५ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच प्रवास करता येईल. विस्तारानं दिलेल्या माहितीनुसार ऑफरवर ब्लॅक आउट डेट्सदेखील लागू होणार आहेत. ब्लॅक आऊट डेट्सचा अर्थ ज्या दिवशी प्रवाशांची मोठं संख्या असेल त्या दिवशी कोणत्याही प्रकारची ऑफर लागू होणार नाही.  या ऑफर अंतर्गत दिल्ली ते लखनौपर्यंतचं इकॉनॉमी क्लासच्या तिकिटांचे दर १८४६ रूपये, प्रिमिअम क्लासचे दर ३०९६ रूपये आणि बिझनेस क्लासच्या तिकिटांचे दर ११,६६६ रूपये असेल. तर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान इकॉनॉमी क्लासच्या तिकिटांचे दर १८६६ रूपये, प्रिमिअम इकॉनॉमी क्लासचे दर २९४६ रूपये आणि बिझनेस क्लासच्या तिकिटांचे दर १२,९६६ रूपये असणार आहे.

टॅग्स :airplaneविमानMumbaiमुंबईdelhiदिल्लीahmedabadअहमदाबाद