शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावे असे 5 रोमॅंटिक डेस्टिनेशन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:02 IST

अनेकजण आपल्या पार्टनरसोबत खास रोमॅंटिक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशात आम्ही तुमच्यासाठी काही खास रोमॅंटिक डेस्टिनेशनती माहिती घेऊन आलो आहोत. 

देशातील काही भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून अनेकजण पावसात फिरायला जाण्याच्या तयारीला लागले आहेत. पाऊस हा अनेकांना भीजवण्यासोबतच रोमॅंटिकही करुन जातो. त्यामुळे अनेकजण आपल्या पार्टनरसोबत खास रोमॅंटिक ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशात आम्ही तुमच्यासाठी काही खास रोमॅंटिक डेस्टिनेशनची माहिती घेऊन आलो आहोत. 

1) अंदामान-निकोबार

रिमझीम पाऊस, समुद्रातून उसळणाऱ्या लाटा, थंडी हवा आणि पार्टनरसोबत कोळशांवर भाजलेलं मक्याचं कणीस खाण्याची मजा काही औरच असेल. पावसाची खरी मजा घ्यायची असेल तर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करु शकता. या सुंदर आणि रोमॅंटिक ठिकाणाची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या बीचवर बसून तुम्ही निळं चमकतं पाणी आणि आभाळ एकत्र येताना बघू शकता. त्यासोबतच येथील शांत वातावरण तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला आणखी जवळ आणेल. 

2) मेघालय

पावसाची हळुवार रिमझीम तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही मेघालयात फिरायला जायला हवं. मेघालयाला ढगांचं घर असंही म्हटलं जातं. कारण इथे जवळपास वर्षभर पाऊस होत असतो. पण तरीही पावसाळ्यात येथील नजारा काही वेगळाच असतो. पावसांच्या सरींमध्ये येथील निसर्ग आणखीन सुंदर होतो.

3) केरळ

परदेशी पर्यटकांना आकर्षित करणारं केरळ हे नदी आणि डोंगरांनी वेढलं गेलेलं आहे. केरळच्या नैसर्गिक सुंदरतेसमोर सगळंकाही गौण वाटायला लागतं. केरळमध्ये पावसाळ्याला ड्रिम सीझन म्हणूनही ओळखलं जातं. समुद्राचं जे रुप केरळमध्ये बघायला मिळतं तसं कुठेही बघायला मिळत नाही. त्यामुळे या दिवसात इथे जास्त प्रमाणात पर्यटक येतात. तुम्हीही हा पावसाळा अधिक रोमॅंटिक आणि यादगार करण्यासाठी इथे जाऊ शकता.

4) गंगटोक

सिक्कीमची राजधानी आणि सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगटोकमध्ये पावसाळ्यात स्वर्गाचा आनंद मिळतो. इतर ऋतूंमध्ये तर इथे पर्यटकांची गर्दी असतेच पण पावसाळ्यात येथील वातावरण अधिक रोमॅंटिक असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इथे पावसाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. 

5) दार्जिलिंग

दार्जिलिंग शहराला पश्चिम बंगालचा स्वर्गही म्हटलं जातं. इथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. हे शहर चहाच्या बागांसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या शहराची सैर करणं एक अविस्मरणिय अनुभव असेल. 

टॅग्स :Travelप्रवासMonsoon Specialमानसून स्पेशल