शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

२०१९ मध्ये लॉग्न विकेंड कमीच, पण योग्य प्लॅनिंग ठरु शकतं फायदेशीर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 11:30 IST

२०१८ मध्ये मित्र आणि परिवारासोबत फिरण्याची अनेकांनी चांगलीच मजा केली. कारण २०१८ मध्ये एकूण १६ लॉन्ग विकेंड मिळाले होते.

(Image Credit : cheapflightsza.co.za)

२०१८ मध्ये मित्र आणि परिवारासोबत फिरण्याची अनेकांनी चांगलीच मजा केली. कारण २०१८ मध्ये एकूण १६ लॉन्ग विकेंड मिळाले होते. याचा भरपूर फायदा घेत अनेकांनी चांगलंच एन्जॉय केलं. पण आता २०१९ हे वर्ष लॉन्ग विकेंडबाबत तितकं चांगलं नसणार आहे. कारण नव्या वर्षात केवळ १० लॉन्ग विकेंड येत आहेत. हे लॉन्ग विकेंडही वेगवेगळ्या कंपन्यांच्या सुट्टीच्या पॉलिसीवर अवलंबून असतं. त्यामुळे या नव्या वर्षात लोकांना सुट्टी कमी घेता येईल आणि काम जास्त करावं लागणार आहे. 

विकेंडसोबत ३ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांची सुट्टी हवी असेल तर कर्मचाऱ्यांना २०१९ मध्ये फार प्लॅनिंग करावं लागणार आहे. त्यांना जास्त सुट्टी घेण्याची गरज पडू शकते. एप्रिलम २०१९ मध्ये आणि ऑगस्ट २०१९ मध्ये सर्वात जास्त सुट्टी मिळतील, पण यासाठी लोकांना काही दिवसांची सुट्टी घ्यावी लागेल. तेव्हाच लोक लॉन्ग विकेंड एन्जॉय करु शकतील. २०१९ मध्ये पहिला लॉन्ग विकेंड १२ जानेवारीला सुरु होणार आहे. म्हणजे शनिवार त्यानंतर १३ जानेवारीला रविवार आणि सोमवारी १४ जानेवारील मकर संक्रात आणि पोंगलची सुट्टी आहे.

मार्च महिन्यात २१ मार्चला होळी आहे. २२ मार्चला तुम्ही सुट्टी घेऊ शकता. त्यानंतर २३ मार्चला शनिवार आणि २४ ला रविवार आहे. एप्रिलमध्ये १७ एप्रिलला महाविर जयंतीची सुट्टी असेल. त्यानंतर एक दिवसाची सुट्टी घेऊ शकता. नंतर १९ एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आणि नंतर २० एप्रिलला शनिवार आणि २१ एप्रिलला रविवार आहे. अशाप्रकारे एप्रिलमध्ये तुम्हाला लॉन्ग विकेंड मिळू शकतो. 

मे महिन्यातही काही प्लॅनिंग करता येऊ शकतं. ९ मे रोजी गुरु रविंद्रनाथ जयंती आहे. त्यानंतर १० मे रोजी एक सुट्टी घ्यावी लागेल. ११ ला शनिवार आणि १२ ला रविवार आहे. लॉन्ग विकेंडसाठी ऑगस्ट महिना जरा अधिक चांगला आहे. कारण १० ऑगस्टला शनिवार, ११ ला रविवार आणि सोमवारी १२ तारखेला बकरी ईद आहे. त्यानंतर १५ ऑगस्ट, १६ तारखेला तुम्ही सुट्टी घेऊ शकता आणि नंतर पुन्हा शनिवार आणि रविवार तुम्हाला सुट्टी मिळू शकते. 

ऑक्टोबर महिन्यातही तुम्हाला काही सुट्ट्या घेऊन लॉन्ग विकेंड एन्जॉय करता येऊ शकतो. म्हणजे ४ ऑक्टोबरला तुम्ही सुट्टी घेतली तर ५ ला शनिवार आणि ६ ला रविवार पडतो. त्यानंतर ७ तारखेला सोमवारी रामनवमी आहे आणि ८ ऑक्टोबरला मंगळवारी दसरा आहे. त्यानंतर २६ आणि २७ ऑक्टोबरला शनिवार आणि रविवार येतो. त्यानंतर सोमवारी २८ तारखेला दिवाळी आमि २९ तारखेला भाऊबीज आहे.  

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सNew Year 2019नववर्ष 2019New Yearनववर्षtourismपर्यटन