काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.