KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.