'लोकमत'च्या वतीने यंदा १८ ऑगस्ट रोजी लंडनच्या ऐतिहासिक भूमीत 'ग्लोबल इकॉनामिक कन्व्हेन्शन'चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित सोहळ्याचे हे दूसरे वर्ष असून, गेल्या वर्षी हा सोहळा सिंगापूर येथे झाला होता. या वर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा होणार आहे.