Did You Know Budget 2025-26 : ब्रिटिशांचे शासन असताना १८६० मध्ये पहिल्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यावेळी कुणालाही ही संकल्पना ठाऊक नव्हती. देशातील कररचना अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली आहे. १८६० पूर्वी देशात एकाही पैशाचा आयकर द्यावा लागत नव्हता.