आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.