शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

बदनामी केल्याप्रकरणी यूटयूब भाई सिद्धू अभंगेसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:18 IST

कोपरीमध्ये यूटयूबचा भाई म्हणून कुख्यात असलेल्या सिद्धू अभंगे आणि त्याचा साथीदार अजय पासी या दोघांना कोपरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. यूटयूबवर कोपरीतील रहिवाशाची बदनामी केल्याप्रकरणी ही अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे कोपरी पोलिसांची कारवाईयाआधीही हाणामारीसह सात ते आठ गुन्हे दाखलराजकीय ओळखी असल्याचे भासवून पसरवली दहशत

ठाणे: कोपरीतील एका रहिवाशाची फेसबुक, यूटयूब आणि व्हॉटसअ‍ॅप या सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्या सिद्धू अभंगे आणि अजय पासी या दोघांना कोपरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. या दोघांवरही हाणामारीसह सात ते आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे ठाण्यातील वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरीतील एका रहिवाशाला श्वानाचे तोंड आणि महिलांचे कपडे परिधान केल्याचे दाखवून ते चित्र फेब्रुवारी २०१९ मध्ये सिद्धू आणि अजय या दोघांनी टाकल्याचा आरोपी आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात आधी तक्रार अर्ज दाखल झाला होता. याचप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर विभागाने चौकशी केल्यानंतर सिद्धू आणि त्याचा साथीदार अजय यांनीच ही बदनामी केल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी संबंधिताने कोपरी पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी बदनामीसाठी बनावट दस्ताऐवज तयार करणे आणि बदनामी करणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्या पथकाने या दोघांनाही ठाणे न्यायालयाच्या आवारातून अटक केली.सिद्धूविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हेयू टयूबचा भाई म्हणून कोपरी परिसरात कुख्यात असलेला सिद्धू पूर्वी कोपरी परिसरात वास्तव्यास होता. सध्या तो लोकपुरम परिसरात वास्तव्याला आहे. त्याच्याविरुद्ध कोपरी, वागळे इस्टेट, चितळसर, राबोडी आणि कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हाणामारी, धमकी देणे आणि खूनाचा प्रयत्न असे सात ते आठ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अगदी अलिकडेच चितळसर पोलिसांनी त्याला एका हाणामारीच्या प्रकरणातही अटक केली होती. शिवसेनेच्या व्यासपीठावरही तो अनेक कार्यक्रमांच्या वेळी वावरत असल्यामुळे बडया राजकीय नेत्यांशी आपले सलोख्याचे संबंध असल्याचा दावाही त्याच्याकडून केला जातो. त्यामुळे आपले कोणी वाकडे करणार नाही, या अविर्भावात असल्यामुळेच त्याने कोपरी परिसरात चांगलीच दहशत पसरविल्याचे बोलले जाते.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया