शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

लोकलसेवा रोखणारा तो तरुण मनोरुग्ण नाही, अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 03:49 IST

झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगल यादव (२०) याने बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायर असलेल्या पोलवर चढून अर्धा तास लोकलसेवा रोखून धरली होती.

ठाणे : झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगल यादव (२०) याने बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायर असलेल्या पोलवर चढून अर्धा तास लोकलसेवा रोखून धरली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात ठाणे रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तो मनोरुग्ण नसून महिन्यापूर्वी महाराष्ट्रात नोकरी शोधण्यासाठी आला होता. मात्र, त्याला नोकरी न मिळाल्याने तो फिरत होता. त्यातूनच तो पोलवर चढला. याचदरम्यान त्याला लोकलमधून येजा करणारे ओरडू लागले. त्यातून कोणीतरी मारेल, या भीतीने तो पोलवर आणखी वर चढल्याची माहिती सूत्रांनी दिली.मंगल हा बुधवारी सायंकाळी अचानक पोलवर चढल्याने रेल्वे प्रशासनाची चांगली दमछाक झाली. दरम्यान, त्याला कोणतीही जखम होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने विद्युतपुरवठा बंद केल्यावर त्याला ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली उतरवले. तोपर्यंत अर्धा तास झाला होता. त्यानंतर, रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. याप्रकरणी ठाणे रेल्वे आरपीएफ दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.वैद्यकीय तपासणीत तो कोणताच रुग्ण नसल्याचे स्पष्टठाणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर तो मनोरुग्ण असल्याचे कोणतेही प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले नाही. तसेच तो आपले नाव आणि पत्ता व्यवस्थित सांगत असल्याने तो मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, त्याला लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी रात्री रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात भारतीय रेल्वे क ायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलcentral railwayमध्य रेल्वेthaneठाणे