शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लोकमान्यनगरमध्ये तलवारीच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 23:36 IST

पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास लोकमान्यनगर परिसरात घडली. यात तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) या तरुणाचा मृत्यू झाला असून अजय सिंग (२४ ) हा गंभीर जखमी झाला आहे.

ठाणे: पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास लोकमान्यनगर परिसरात घडली. यात तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) या तरुणाचा मृत्यू झाला असून अजय सिंग (२४ ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोकमान्यनगर पोलीस चौकी समोरच ही घटना घडली. घटनेच्या वेळी एकही पोलीस तिथे नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.लोकमान्यनगर परिसरात राहणा-या या दोन गटात जुना वाद होता. याच वादातून चौघा जणांनी तलवारीने तरसेम आणि अजय या दोघा तरुणांवर सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी दोघांच्या पोटात तलवारी घुसविल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, तरसेम याला उपचारासाठी नेले जात असतांनाच त्याचा मृत्यू झाला. तर अजय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला नव्यानेच बांधण्यात आलेल्या लोकमान्यनगर पोलीस चौकी समोरच झाला. नेमकी हल्ल्याच्या वेळी तिथे एकही पोलीस हजर नव्हता. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.''हा काही मित्रांच्या गटातील आपसातील वाद आहे. तिवारी नामक व्यक्तिसह तिघांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मारेक-यांची माहिती मिळाली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.''- सुनिल लोखंडे, उपायुक्त, वागळे इस्टेट विभाग, ठाणे

 

टॅग्स :Crimeगुन्हा