शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

युवासेना पदाधिका-याची तरुणास जबर मारहाण, पक्षस्तरावर कारवाई करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 20:35 IST

ठाणे : घोडबंदर रोडवरील एका युवकास युवा सेनेच्या एका पदाधिका-यासह त्याच्या मित्रांनी शनिवारी रात्री उशिरा जबर मारहाण केली.

ठाणे : घोडबंदर रोडवरील एका युवकास युवा सेनेच्या एका पदाधिका-यासह त्याच्या मित्रांनी शनिवारी उशिरा रात्री जबर मारहाण केली. हिरानंदानी मिडोजमधील हॉटेल लॉन्ज 18 मध्ये ही घटना घडली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून, चितळसर पोलिसांनी याप्रकरणी रविवारी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.घोडबंदर रोडवरील विजय रेसिडेन्सीचे रहिवासी प्रतीक विश्वनाथ भंडारे (वय 25) यांच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रात्री लॉन्ज 18 मध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेलमध्ये दोन टेबलावर प्रतीक भंडारे आणि त्यांचे मित्र जेवणासाठी बसले होते. जवळच असलेल्या दुस-या एका टेबलावर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघांचा युवा सेनेचा उपनिरीक्षक ईशान बलबले त्याच्या मित्रंसोबत बसला होता. जेवण झाल्यानंतर प्रतिकचा मित्र रोनित हात धुण्यासाठी बेसिनकडे जात असताना ईशान बलबलेला त्याचा धक्का लागला. त्यामुळे ईशानने रोनितला शिवीगाळ करून माफी मागण्यास सांगितले. हा वाद इथेच संपला.थोड्या वेळाने प्रतीक भंडारे यांच्या मोबाईल फोनवर मित्राचा कॉल आला. हॉटेलमधील गोंधळामुळे आवाज येत नसल्याने मित्राशी बोलण्यासाठी प्रतीक भंडारे हॉटेलबाहेर आले. तिथे ईशान बलबले, जुबेर आणि त्यांच्या मित्रांनी प्रतीक भंडारे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. लोखंडी सळईने डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने ते खाली कोसळले. त्यानंतर आरोपींनी गुप्तांगावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप प्रतीक यांनी केला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला आधी शासकीय रूग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. जखमीचा हॉस्पिटलमधून जबाब घेतल्यानंतर रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.युवा सेना जखमीच्या पाठीशी - पूर्वेश सरनाईकप्रतीक भंडारे यांना ईशान बलबलेने जबर मारहाण केल्यामुळे ही युवा सेनेच्या कारभारावर गंभीर आरोप होत असताना आपली संघटना जखमीच्या पाठीशी असल्याचे युवा सेनेचे ठाणे शहराध्यक्ष तथा नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट केले. सरनाईक यांनी जखमीची विचारपूस करून त्याला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. हा प्रकार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षश्रेष्ठींना कळविण्यात आला आहे. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर याप्रकरणी पक्षस्तरावरून कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ईशान बलबले हा युवा सेनेचा पदाधिकारी असून, ठाण्यातील रेनबो इंटरनॅशल स्कूलच्या संचालक मंडळामध्येही आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना