शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपरच्या तरुणाची हत्या, मृतदेह फेकला मुबई नाशिक महामार्गावर; पोलिसांनी केले आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 12:26 IST

मंगळवारी सकाळी मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा बायपास लगत पुलाखालील  झाडीत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीम च्या सदस्यांनी कसारा पोलिसांना दिली होती.

कसारा : शाम धुमाळ

मंगळवारी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा बायपास जवळ एक अनोळखी मृतदेह सापडला. या प्रकरणी काहींनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी तपास करुन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा बायपास लगत पुलाखालील  झाडीत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीम च्या सदस्यांनी कसारा पोलिसांना दिली होती. यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव,  पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव यांनी घटनास्थळी  धाव घेतली. घटनास्थळ विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा मृतदेह काही तासाभरा पूर्वी चा असल्याने  कसारा पोलिसांनी तात्काळ  याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली.

घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी,कर्मचारी, फॉरेन्सिक लॅब व डॉग स्कॉड यांनी  भेट दिली त्या दरम्यान मयत तरुणाची हत्या करून फेकण्यात आल्याची खात्री झाल्यानंतर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सुरेश मनोरे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव यांनी  तपास कामी 3 पथक तयार केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव यांनी संयुक्तरित्या तपास करीत मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश साहिल, संतोष सुर्वे, सतीश कोळी, सुनील कदम, हेमंत विभुते, विजय भोईर, स्वप्नील बोडके, गोविद कोळी यांनी घाटकोपर असल्फा व्हिलेज येथून चंद्रसेन पवार तर अंधेरी येथून हृतिक पांडे, नुरमोहंमद चौधरी अशा 3 संशयिताना ताब्यात घेतले.

यातील मुख्य संशयित आरोपी चंद्रसेन पवार याने विजय बिभीषण जाधव वय 35 याची हत्या करून मृतदेह फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपी चंद्रसेन पवार याचे मयत विजय जाधव रहात असलेल्या घाटकोपर येथील घर हे मला देणार होता, अनेक वर्ष तगादा लावून देखील  विजय घराचा ताबा देत नसल्याने व ते घर दुसऱ्या कोणाला देणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याला अज्ञात ठिकाणी गाठून माझ्या सहकारी मित्रांच्या मदतीने विजय जाधव याचा गळा आवळून ठार केले व त्याला कसाऱ्या जवळ एका पुला खली फेकून दिला असल्याची माहिती आरोपी ने पोलिसांना दिली.