शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

खासगी रुग्णालयातील भरमसाट बिले कमी करून देण्यासाठी तरुणांची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 23:48 IST

मीरा-भाईंदर युवक काँग्रेसचा पुढाकार : हजारो रुपये कमी झाल्याने रुग्णांच्या नातलगांना लाभला दिलासा

मीरा रोड : राज्य शासनाने कोरोना उपचारांसाठी रुग्णालयातील दर निश्चित केलेले असताना अनेक खासगी रुग्णालये मनमानी शुल्क वसुली करत असल्याने याविरोधात मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी सहायता मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे अनेक रुग्णांची हजारो रुपयांची बिले कमी होऊन मोठा दिलासा मिळाला आहे.

मीरा-भाईंदर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीप काकडे आणि ओवळा - माजिवडा १४६ चे अध्यक्ष कुणालादित्य काटकर या दोघा तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्याकडून खासगी रुग्णालये मनमानी वसुली करीत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षीसून सुरू आहेत. शासनाने खासगी रुग्णालयाच्या लुटीला आळा घालण्यासाठी उपचारांचे दर निश्चित केले आहेत. महापालिकेनेसुद्धा बिलांचे ऑडिट सुरू केले आहे. तरीही खासगी रुग्णालयांकडून लूट काही थांबलेली नाही.

रुग्णांकडून जास्त देयक आकारले असेल तर शासन दरानुसार त्याची पडताळणी करायला लावून देयकाचे पैसे कमी करण्यासाठी काकडे व काटकर यांनी मोहीम सुरू केली. बिलाची रक्कम जास्त वाटल्यास अडचणीतील रुग्णांच्या नातलगांना त्यांनी संपर्कासाठी ई-मेल आणि भ्रमणध्वनी क्रमांक दिले.प्रदेश काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही मोहीम सुरू केली. काही खासगी रुग्णालये कोरोना रुग्ण व नातलगांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन जास्त बिल तयार करतात आणि त्याची वसुली सक्तीने करत असल्याच्या असंख्य तक्रारी येत होत्या, असे काकडे म्हणाले.

nमीरा रोडच्या पद्माकर म्हात्रे रुग्णालयाने एका रुग्णास आकारलेले जास्तीचे तब्बल दीड लाख रुपये शासन दरानुसार आढावा घेऊन कमी करायला लावले. श्री परमहंस रुग्णालयाविरोधात जास्त दराकरिता गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. nरिद्धीसिद्धी रुग्णालयाने जास्त आकारलेले ५२ हजार ४१० रुपये तर फॅमिली केअर रुग्णालयाने जास्त आकारलेले १६ हजार ७२५ रुपये कमी करून दिल्याचे काटकर यांनी सांगितले .nशासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना शुल्क आकारल्यास रुग्णालयांचे नाव खराब होणार नाही आणि रुग्ण व नातलगांना दिलासा मिळेल.

 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल