शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तरुणांनी ताज्या विषयांवर केली मनमोकळी चर्चा, अजेय संस्थेचा कार्यक्रम संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 16:43 IST

ठाण्यातील अजेय नाट्यसंस्थेला 1 एप्रिल 2019 ला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देतरुणांनी ताज्या विषयांवर केली मनमोकळी चर्चा अजेय संस्थेचा कार्यक्रम संपन्न नाजूक विषयावर मांडली अनेक निरीक्षणं व मत

ठाणे : सहयोग मंदिर येथे अजेय संस्थेचा दशकपूर्ती महोत्सव अजेय संस्था आणि व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वसंवाद' आयोजित केला होता. जागतिक कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे साजराकरण्याचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण होते. 'अपना टाईम आयेगा म्हणजेच वेगळी वाट निवडलेले कलाकार' , 'हार्दिक निमंत्रण म्हणजेच आयोजन व पाडद्यामागची आव्हानं' , 'हाऊज द जोश म्हणजेच चळवळीतील तरुण सहभाग' आशा ताज्या विषयांवर चर्चासत्र रंगली. 

       अभिनेता पवन वेलकर, पै फ्रेंड्स लायब्ररीचा संस्थापक सदस्य भूषण पत्की, संगीतकार-गायक सोहम पाठक, लेखिका स्वाती भट, छायाचित्रकार व लेखिका गार्गी गीध ह्या तरुण कलाकारांनी अपना टाइम आयेगा चर्चा सत्रात त्यांच्या वेगळ्या वाटेवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तरुणाईच्या मनातील अनेक प्रश्न विचार रसिकांसमोर मांडले, त्यांच्या प्रेरणांविषय गप्पा मारल्या. सायली शिंपी हिने ह्या सगळ्यांशी संवाद साधला. आयोजक व कवी संकेत म्हात्रे, आयोजक व प्रकाशक निलेश गायकवाड, संगीतकार व आयोजक वृंदा दाभोळकर, आयोजक कार्तिक हजारे-हेमांगी कुळकर्णी, नेपथ्य नियोजक वर्षा ओगले-कल्पेश पाटील ह्या सर्व आयोजकांनी हार्दिक निमंत्रण चर्चा सत्रात आयोजनातील अडचणी व उपायोजना ह्यावर अनेक पैलूंना चर्चा केली. तपस्या नेवे ह्यांनी सर्वांशी संवाद साधला. डॉ.क्षितिज कुलकर्णी, वसंती वर्तक, प्रा. दीपा ठाणेकर,प्रा.विद्याधर वालावलकर, क्षितिज देसाई ह्यांनी हाऊज द जोशमध्ये चळवळ व तरुण ह्या नाजूक विषयावर अनेक निरीक्षणं व मत मांडली, चळवळीत आवश्यक बदल अनेक पैलूंना सांगितले. ह्या सर्वांशी अवधूत यरगोळे ह्याने संवाद साधला. ह्या कार्यक्रमाची संकल्पलना संस्थेचे संस्थापक डॉ. क्षितिज कुलकर्णी ह्यांची असून येणाऱ्या प्रोजेक्ट्स बद्दल गौरव संभुस ने मुलाखतीत सांगितले. 'इंद्रायणी काठी' व 'खेड्यामधले घर कौलारू' हे दोन काव्यचित्रपट , तर 5 3 2 टीम तर्फे ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र ह्या पु.लं.देशपांडे लिखित उताऱ्याचे अभिवचन, अजेय संस्थेचे अध्यक्ष गौरव संभुस ह्याची निवेदक व मुलाखतकार सौरभ सोहिनीने घेतलेली मुलाखत असे सुंदर पॅकेज रसिक प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. आभार प्रदर्शनात मनीषा चव्हाण ह्यांनी स्वरचित काव्यांनी रंग वाढवला. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे पाहुणे जागतिककीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर सर ह्यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीने कळस चढवला.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई