शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात क्षुल्लक कारणावरुन राबोडीतील तरुणावर गोळीबार ; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 01:14 IST

काही किरकोळ कारणावरुन मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान ( ३०) यांच्यावर चाकूने हल्ला करीत पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या घटनेमध्ये खान गंभीर जखमी झाले असून गोळी चुकल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.

ठळक मुद्दे गोेळी चुकल्याने जीव बचावला राबोडी पोलिसांनी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: काही किरकोळ कारणावरुन मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान ( ३०) यांच्यावर चाकूने हल्ला करीत पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या घटनेमध्ये खान गंभीर जखमी झाले असून गोळी चुकल्याने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी शबीर अब्दुल गौस (३०) याला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. खान हे नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. ते त्यांचा मित्र इम्रान खान उर्फ बंटी यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. त्याचाच राग शबीर याच्या मनात होता. शबीर हा खान यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगत असे. दरम्यान, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खान राबोडीतील रफ्तार हाऊसजवळील तपासेनगर याठिकाणी आपल्या मित्रांसोबत बसलेले होते. त्याचवेळी शबीर त्याच्या एका साथीदारासह मोटर सायकलवरु न तिथे आला. शबीरने त्याला मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह धरला. मात्र, खान यांनी त्याच्या मोटारसायकलवर बसण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने शबीर आणि त्याच्या साथीदाराने खान यांना मारहाण केली. त्यानंतर शबीरच्या साथीदाराने चाकूने खान यांच्या हातावर वार केले. त्यावेळी शबीर शेख याने तुम बहोत भाई बनते हो,अभी मै तुझे जिंदा नही छोडुंगा असे म्हणून पिस्तुलच्या मागील बाजूने खान यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर पिस्तूल मधून एक राऊंड खान यांच्या दिशेने गोळीबारही केला. मात्र, गोळी चुकल्याने खान या घटनेतून थोडक्यात बचावले. शबीर आणि त्याचा साथीदार मोटरसायकलवरु न पळून गेले. मात्र, या हल्ल्यात खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी