शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीच्या भांडणात तरुणाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 01:23 IST

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरु णाच्या जीवावर बेतल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अजंठा कम्पाउंड परिसरात घडली.

भिवंडी : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरु णाच्या जीवावर बेतल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अजंठा कम्पाउंड परिसरात घडली. पतीने साथीदाराच्या मदतीने या तरु णाची धारदार चॉपरने वार करून हत्या केली. नदीम मोमीन (३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून इम्रान रसूल सय्यद याला अटक केली आहे.आरोपी इम्रान आणि त्याच्या पत्नीमध्ये सहा महिन्यांपासून घटस्फोटावरून वाद सुरू आहे. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी नदीम हा इम्रानच्या घरी गेला होता. तेव्हा दोघांच्यात वाद होऊन आमच्या भांडणात न पडण्याची धमकी इम्रानने नदीमला दिली. त्यावरून दोघांमध्ये हाणामारीही झाली. त्याचा राग धरून इम्रानने साथीदाराच्या मदतीने नदीमवर मध्यरात्री अजंठा कम्पाउंड परिसरात चॉपरने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यांत पडलेल्या नदीमला सोडून आरोपी परतत असताना जमावाने इम्रानला पकडून चोप दिला. मात्र, त्याचा साथीदार पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला. मारहाणीत जखमी झालेल्या इम्रानला ताब्यात घेऊन ठाण्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.>व्हिडीओ कॉल करून पत्नीला दिली माहितीआरोपी इम्रानने नदीमची हत्या करण्यापूर्वीचा आपला व्हिडीओ पत्नीला पाठवला होता. तसेच त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करून नदीमची हत्या करणार असल्याचे कळवले असल्याची माहिती आरोपीच्या पत्नीने पोलिसांना दिली.