शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, ISRO मध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:04 IST

भारतात ओबीसीमध्ये सर्वप्रथम 

ठळक मुद्देथोडं थांबा काहीतरी वेगळं करायचंय अस त्याने कुटुंबियांना सांगितले. आणि टाटा स्टीलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला.

बदलापूरबदलापूरातील एका रिक्षा चालकाच्या मुलाची इस्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. देवानंद सुरेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. देवानंदच्या या यशामुळे बदलापूरच्या लौकिकात भर पडली असून त्याबद्दल या तरुणावर व त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.देवानंद मेकॅनिकल इंजिनिअर असून सध्या टाटा स्टिल जमशेदपूर येथे इंजीनिअर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी देवानंदची रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली होती.परंतु ही नोकरी त्याने नम्रपणे नाकारली.

थोडं थांबा काहीतरी वेगळं करायचंय अस त्याने कुटुंबियांना सांगितले. आणि टाटा स्टीलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला. त्यापैकीच एक असलेल्या इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) परीक्षेत देवानंद देशात ओबीसी मध्ये पहिला आला असून त्याची जूनियर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी(ता.३०) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महिन्याभरात त्याची नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार हे स्पष्ट होणार असल्याचे देवानंदचे वडील सुरेश पाटील यांनी सांगितले. देवानंदची एक बहीण इंजिनियर म्हणून नोकरी करत आहे.तर दुसरी जळगाव शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या तिन्ही मुलांनी दहावीपासूनच सुयश मिळवले आहे. देवानंदला दहावीला ९७.९ टक्के,मोठ्या बहिणीला ९४ टक्के गुण होते.तर धाकटी बहीण ९७.२० टक्के गुण मिळवून मुंबई बोर्डात तिसरी आली होती.

मुलाच्या यशाचा आनंद अवर्णनीय

सुरेश पाटील हे बदलापुरातील एक प्रामाणिक रिक्षा चालक असून दिवसरात्र १२-१४ तास रिक्षा चालवून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या पत्नीने दररोज ७-८ तास पापड तयार करण्याचे काम करून त्यांना साथ दिली.मुलांच्या या यशाने या कष्टाचे चीज झाले असून हा आंनद अवर्णनीय असल्याच्या भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :isroइस्रोauto rickshawऑटो रिक्षाexamपरीक्षाbadlapurबदलापूर