शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन टास्क जॉब देण्याच्या आमिषाने योगा शिक्षिकेला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 20:58 IST

अनोळखी टेलिग्रामधारकाने केली फसवणूक.

जितेंद्र कालेकर (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ऑनलाइन फसवणुकीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. राबोडी परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय योगा शिक्षिकेला ऑनलाइन टास्क पूर्ण करून दिवसाला हजारो रुपयांच्या कमाईचे आमिष दाखवून अनोळखी सायबर भामट्यांनी दोन लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी मंगळवारी दिली.

राबोडी भागात राहणाऱ्या या योगा शिक्षिकेला २ ते ६ जुलै या काळात मोबाइलवर टेलिग्राममध्ये एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये ऑनलाइन पार्ट टाइम जॉब देण्याची बतावणी केली होती. ऑनलाइन मेसेज केल्यानंतर गुगल रिव्ह्यू टास्क सोडवून दिवसाला तीन ते चार हजार रुपये मिळविण्याचे प्रलोभनही त्याच मेसेजद्वारे दाखविले होते. चांगला जॉब आणि मोठी रक्कम पदरात पडेल, या भाबड्या आशेने महिलेने हे काम करण्याची इच्छाही दर्शवली. त्यानंतर तिच्या मोबाइलवर लिंक आणि मेसेज पाठवून तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. पुढे वेळोवेळी तिच्या बँक खात्यातून दोन लाख ६२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही जॉब न देता सायबर भामट्याने स्वत:चे फोन मात्र बंद करून ठेवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने ५ ऑगस्ट रोजी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणे