शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नगर मार्गावरील दरोड्यातील फरारी आरोपी एक वर्षाने जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:07 IST

वर्षभरापूर्वी पुणे-अहमदनगर महामार्गावर एका सिगारेट कंपनीच्या वाहनातून नऊ दरोडेखोरांनी ३५ लाखांचा माल लुटला होता. त्यापैकी आकाश दिगंबर फड (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाईसात जणांना यापूर्वीच झाली अटकआणखी एकाचा शोध सुरुच

ठाणे : पुणे-अहमदनगर महामार्गावर वर्षभरापूर्वी एका सिगारेट कंपनीच्या वाहनातून नऊ दरोडेखोरांनी ३५ लाखांचा माल लुटला होता. त्यापैकी आकाश दिगंबर फड (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. त्याला सुपा (जिल्हा अहमदनगर) पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुण्याच्या रांजणगाव एमआयडीसीतील एका सिगारेट कंपनीचा माल नगरकडे जात असताना २०१७ मध्ये नऊ जणांच्या टोळक्याने या मालवाहू ट्रकमधील सुमारे ३५ लाख सहा हजारांचा माल लुटला होता. याप्रकरणी अहमदनगरच्या सुपा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील नऊपैकी सात जणांना यापूर्वीच अटक झाली आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा माल हस्तगत केला होता. अन्य दोन फरार आरोपींपैकी आकाश हा ठाण्याच्या वंदना सिनेमा, एसटी स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांना मिळाली होती. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांच्या पथकातील पोलीस हवालदार दिलीप तडवी, पोलीस नाईक रूपवंत शिंदे आणि कॉन्स्टेबल सागर सुराळकर यांच्या पथकाने आकाशला ३० जुलै रोजी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला या प्रकरणात ३१ जुलै रोजी सुपा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाRobberyदरोडा