शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

यवतमाळचा पादत्राणे विक्रेता ठरला लोकप्रिय गझलकार

By admin | Published: February 07, 2017 3:47 AM

पु.भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली : यवतमाळ येथील एका छोट्याशा गावातून आलेले आबीद शेख यांनी ‘सुगंधी बाग आहे, ती तिला माहीत नाही

पु.भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली : यवतमाळ येथील एका छोट्याशा गावातून आलेले आबीद शेख यांनी ‘सुगंधी बाग आहे, ती तिला माहीत नाही’, ही गझल अखिल भारतीय साहित्य संमेलनात सादर केली आणि प्रेक्षकांकडून वन्स मोअर मिळविला. याच गावात पादत्राणे विक्रीच्या दुकानात ते काम करतात. त्यांच्यामध्ये असलेल्या कलाकाराला तेथे वाव मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.सावना गावात आबीद राहत असून त्यांचे सर्व शिक्षण तेथेच झाले. ते शालेय जीवनात नाटक लिहीत असत. त्यांचे वडील मनसुख यांना हिंदी गझल आवडत असे. त्यामुळे लहानपणापासून घरात गझलचे वातावरण होते. महाविद्यालयीन जीवनात त्यांना एकदा भीमराव पांचाळे यांनी गायिलेली आणि सुरेश भट यांची ‘आसवांचे जरी हसे झाले, हे तुला पाहिजे तसे झाले’ ही गझल ऐकण्याची संधी मिळाली. ही गझल त्यांना प्रेरणा देणारी ठरली. पूर्वी केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गझल लिहीत होतो. पण, भटांची गझल ऐकल्यावर मराठी गझल लेखनाकडे वळल्याचे ते म्हणाले.माझ्या लेखनावर गावातून प्रतिक्रिया येत नव्हत्या. माझी एक गझल भीमराव यांनी संगीतबद्ध करून उमरखेड येथील एका मैफलीत ऐकवली. ती गझल झाल्यावर भीमराव यांनी मला स्टेजवर बोलावले आणि आपल्या अंगावरील शाल काढून माझ्या खांद्यावर दिली. तो क्षण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या प्रसंगाने मनोबल वाढण्यास मदत झाल्याचे आबीद यांनी सांगितले. ते म्हणतात, अनेक गझल संमेलनांना ते गेले आहेत. खेडेगावात गझलचे फारसे कार्यक्रम होत नाही. पुणे, मुंबई येथे गझलचा जाणकारवर्ग आहे. कवितेची एक वेगळी थीम असते, तर गझल ही वेगवेगळ्या थीममध्ये तयार होते. गझल ही एक स्वतंत्र कविता आहे. या साहित्य संमेलनात मला कोणी बोलावले, याविषयी मला काहीच माहीत नाही. विदर्भ साहित्य संघाकडून मला पत्र आले आणि मी येथे आलो. संमेलनात गझलला स्थान मिळाले आहे, ही अत्यंत चांगली बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)