शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आंदोलनाकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पाठ तर माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 04:45 IST

राष्ट्रवादीत आजीमाजीचा रंगलाय वाद : रॅलीत काँग्रेसचाही सहभाग नाही

कल्याण : अंतर्गत गटबाजी कशी रोखायची, असा प्रश्न स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाला पडला असताना शनिवारी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या राफेल विमानखरेदी घोटाळा जागृती रॅलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गटबाजीचे दर्शन घडले. या रॅलीत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सहभागी केले जाणार होते; परंतु त्यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखवल्याने रॅलीच्या माध्यमातून छेडण्यात आलेले निषेध आंदोलन चर्चेचा विषय ठरले होते.

एकीकडे पक्षाची सुरू असलेली घसरण आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी गटबाजी, श्रेयवाद आणि वर्चस्ववादात पदाधिकारी गुंतल्याने जनमानसात पक्षाची प्रतिमा ढासळत चालली आहे. याची प्रचीती राज्य व केंद्र सरकारच्या निषेधार्थ छेडलेल्या मौनव्रत आंदोलनादरम्यान माजी पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेले धक्काबुक्की प्रकरण तसेच सुसंवाद सभांमधूनही आली आहे. गटबाजी आणि श्रेयवाद सर्रासपणे सुरू असताना शिष्टाचारदेखील पाळला जात नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये नागरी समस्यांवर पक्ष फारसा रस्त्यावर उतरताना दिसत नाही. केंद्र आणि राज्यपातळीवरील विषय घेऊन पक्षाच्या आदेशाप्रमाणे नावापुरती आंदोलने छेडली जात आहेत. या आंदोलनांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नगण्य उपस्थिती हादेखील चर्चेचा विषय ठरत आहे. याचा प्रत्यय शनिवारी पुन्हा एकदा निषेध रॅलीदरम्यान आला. पश्चिमेतील कोपर रोड स्थानकापासून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप मानपाडा रोडवरील पांडुरंग विद्यालयासमोर झाला. विशेष बाब म्हणजे या रॅलीला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थिती लावली असताना जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि डोंबिवली शहराचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश शिंदे हे अनुपस्थित राहिले. नवीन कार्यकारिणीत पदे न मिळालेल्या नाराज गटाने या आंदोलनाचे आयोजन केल्याने या नवनियुक्तांनी आंदोलनाला पाठ दाखवल्याचे बोलले जाते. संबंधित पदाधिकाºयांना ऐनवेळी आंदोलनाबाबत कळवण्यात आल्याने त्यांनी सहभागी होणे टाळले, अशीही चर्चा आहे. याबाबत, त्यांच्याशी संपर्क साधला असता दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेल्याने सहभागी होता आले नाही, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. परंतु, या रॅलीच्या निमित्ताने विद्यमान पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी अशी गटबाजी उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या रॅलीत सहभागी होणार होते; परंतु त्यांचा एकही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी दिसून आला नाही.सहभागी होणे अपेक्षित होतेनवनियुक्त पदाधिकाºयांमध्ये केवळ डोंबिवली शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ही दोनच पदे आजवर घोषित करण्यात आली आहेत. संबंधित रॅली आंदोलनाबाबत जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना पत्र देण्यात आले होते. त्यांनी प्रमुख पदाधिकारी म्हणून आंदोलनात सहभागी होणे अपेक्षित होते. पण, ते आले नाही. परंतु, आम्ही काढलेल्या रॅलीला चांगला प्रतिसाद लाभला, अशी प्रतिक्रिया डोंबिवली शहर राष्ट्रवादी माजी कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांनी दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiमुंबई