शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पुढील जन्म ठाण्यात घ्यायला आवडेल, पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 04:10 IST

ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे २६ वे पं. मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे : मुंबईत आल्यावर मला ठाणे हे गाव आहे, असेच आधी वाटले होते. पण, येथील श्रोत्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे मला देवाने पुढील जन्मस्थळ निवडण्याची संधी मिळाली तर, मी ठाण्याचीच निवड करेल, असे ठाण्यातील रसिकांविषयीचे गौरवोद्गार पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शुक्रवारी पंडित राम मराठे संगीत महोत्सवात काढले.पंडित चौरसिया यांना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. हार्मोनियम वाद्यासाठी फेलोशिपचे पहिले मानकरी ठरलेले ठाण्याचे अनंत जोशी यांना संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती युवा पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले.ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे २६ वे पं. मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध बासरीवादक विवेक सोनार यांच्या वादनाने झाली. याप्रसंगी खासदार राजन विचारे, ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर, अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, विद्याधर ठाणेकर, ठामपा सभागृहनेते अशोक वैती, महापालिका उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.दोन दिग्गजांचा सन्मानकार्यक्रमात पंडित चौरसिया यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचाही सन्मान करण्यात आला. उस्ताद राशीद खान हे १० वर्षांनी या महोत्सवात उपस्थित राहिल्याने त्यांचाही चौरसिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.शिंदेंची अनुपस्थिती;रसिकांची गर्दीगतवर्षी पं. मराठे संगीत महोत्सवाकडे ठाणेकर रसिकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे यंदा महापालिकेने काळजी घेतल्याने रसिकांची बऱ्यापैकी गर्दी होती. बºयाच वर्षांनी बाल्कनीत प्रेक्षक पाहण्यास मिळाल्याचे यावेळी महापौर म्हस्के म्हणाले. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव केला जाणार होता. मात्र, ते अनुपस्थित राहिल्याने महापौरांच्या हस्ते सत्कारमूर्तींना गौरवण्यात आले.आम्हाला पैसे खर्चकरावे लागतात - म्हस्केमहोत्सवात आलेली कलाकार मंडळी आणि आम्ही राजकारणीही कलाकार मंडळीच आहोत. आम्हीसुद्धा आमची कला सादर करून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असतो. ही कलाकार मंडळी कला दाखवून रसिकांना खूश करतात. पैसे मोजून प्रेक्षक त्यांना ऐकण्यासाठी येतात. पण, आम्हाला पैसे खर्चून प्रेक्षकांना जमवावे लागते, असे महापौर म्हस्के यावेळी म्हणाले.पुरस्काराचे स्वरूपपं. चौरसिया यांना ५० हजार आणि स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ तर जोशी यांना २५ हजार आणि स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे