शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक महिला दिन विशेष : आहेर कुटुंबियांनी केले ‘नन्हेपरी’चे ढोलताशांच्या गजरात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 17:24 IST

कल्याणच्या एका कुटुंबाने आपल्या घरी आलेल्या नन्ही परीचं स्वागत ढोलताशांच्या गजरात करून एक पाऊल पुढे टाकले आहे.

कल्याण : आज जागतिक महिला दिन मोठय़ा उत्साहात साजरा होत असला तरी ‘बेटी बचाव’च्या केवळ गप्पा मारल्या जातात. अद्याप ही स्त्री भ्रूण हत्येचा डाग पुसला जात नाही. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या एका कुटुंबाने आपल्या घरी आलेल्या नन्ही परीचं स्वागत ढोलताशांच्या गजरात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांचे हे पाऊल समाजासमोर आदर्श निर्माण करणारे आहे. आज प्रत्येक क्षेत्रत स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्यापेक्षा कांकणभर सरस कामगिरी करताना दिसत आहेत. संसाराच्या गाडयापासून ते स्पेसरॉकेट चालवण्यार्पयतच्या त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एकीकडे नवदुर्गा आपल्या बळाच्या जोरावर दशदिशा व्यापून टाकत असताना दुसरीकडे मात्र स्त्री भ्रूण हत्येच्या माध्यमातून तिला संपवण्यासारखे दुदैवी प्रकारही घडत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता कल्याणातील आहेर कुटुंबाने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा परिसरात हे आहेर कुटुंबिय राहतात. काही आठवडय़ांपूर्वी त्यांच्याकडे कन्यारत्न चे आगमन झाले. या नन्ही परीला ढोलताशांच्या गजरात घरी आणण्याची तिचे बाबा किरण आहेर यांची इच्छा होती. मात्र घरी आणण्याच्या दिवशीच या चिमुरडीला कावीळ आणि तिच्या आईला डेंग्यु झाल्याने आहेर कुटुंबीय चिंतेत पडले होते. तिची आई एका रूग्णालयात आणि चिमुरडी एका रूग्णालयात अशी परिस्थिती होती. या दोघींनाही आपल्या आजारांवर मात केली. मग पूर्वी ठरल्याप्रमाणो या कुटुंबाने आपल्या चिमुरडय़ांचे ढोलताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत केले. साईराज वाद्य पथकातील मुलींनी या नवदुर्गेचे आणि त्या मातृशक्तीसाठी असे काही वादन केले की ते पाहून सर्वजण अक्षरक्ष: थक्क झाले. एका स्त्रीशक्तीने या जगात नुकत्याच आलेल्या दुस:या एका स्त्रीशक्तीचे अशाप्रकारे केलेले स्वागत हे जितके दुर्मिळ तितकेच स्वागतार्ह म्हणावे लागेल. आहेर कुटुंबियांच्या या सुंदर संकल्पनेला साईराज वाद्य पथकांनेही कोणतेही मानधन न घेता उत्स्फुर्त साथ दिला. आहेर कुटुंबियानी समाजातील नकोशीला हवीशी करण्यासाठी घेतलेल्या सकारत्मक भूमिकेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. स्त्रीभ्रुण हत्येचा कलंक कायमचा पुसण्यासाठी आज आपल्या समाजाला अश्या शेकडो आहेर कुटुंबाची नितांत गरज आहे. 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८kalyanकल्याण