शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

ठाण्यात बांधकाम परवानगीसाठी जागतिक बँकेची नियमावली लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 5:03 AM

शहरविकास विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी दिल्या.

ठाणे : पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी खाडीकिनारी खारफुटी सफारी करणे, स्थावर मालमत्तांचे नियमन करून त्याचे डिजिटायझेशन करणे तसेच शहरविकास विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना जागतिक बँकेच्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी दिल्या. तसेच येत्या तीन महिन्यांत शहरातील सार्वजनिक आणि सामूहिक शौचालयांचे अत्याधुनिकीकरण करण्याला प्राधान्य देऊन त्यासाठी समान कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी घनकचरा विभागाला दिल्या.यासंदर्भात बुधवारी ईवाय या सल्लागार संस्थेसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, समीर उन्हाळे, ईवायचे वरिष्ठ प्रबंधक रुचिर राज महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना आयुक्तांनी ठाणे शहराला लाभलेल्या खाडीकिनारी मँग्रोज ट्रेलर्स सुरू करून पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्यान विभागाने अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर स्थावर मालमत्तांचे नियमन करून त्याचे डिजिटायझेशन करण्याबाबतही महापालिका आयुक्तांनी स्थावर मालमत्ता विभागास सूचित केले.याबाबत मालमत्तांची वर्गवारी, त्यांची करण्यात आलेली आकारणी, त्याचा कालावधी आदी सर्व माहिती संकलित करून स्थावर मालमत्ता विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी डिजिटायझेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. महत्त्वाचे म्हणजे पुढील तीन महिन्यांत शहरातील सर्व सार्वजनिक आणि सामूहिक शौचालये स्वच्छ व नीटनेटकी राहावीत, यासाठी त्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी ईवाय या संस्थेने महापालिकेस कृती आराखडा तयार करून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.>‘अभ्यास करून अहवाल सादर करावा’पालिकेच्या शहर विकास विभागाच्या माध्यमातून बांधकामासाठी परवानगी देताना जागतिक बँकेच्या नियमावलीची कशी अंमलबजावणी करता येईल, यासाठी ईवाय या संस्थेने अभ्यास करून अहवाल सादर करावा असे सांगितले.