शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भिवंडी तालुक्यातील रस्ते, साकव पुलाच्या ३० कोटीं खर्चाच्या भ्रष्टाचाराविरोधात श्रमजीवीचे ठिय्या आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: February 16, 2023 17:14 IST

पीडब्ल्यूडीच्या कॅम्पसमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी आज दिवसभर ठिय्या आंदोलन छेडून प्रशासनाला धारेवर धरले.

ठाणे : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) भिवंडी तालुक्यातील पिळंझे (बु), देपोली, साखरोली गांवांसाठी रस्ते, पूल, साकव, सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यांची कामे आदी आदिवासी विभागाच्या निधीतून करण्यात येत आहे. या रस्ते, ब्रिज, संरक्षण भिंत इत्यादी कामांच्या नावाने आज तागायत ३० ते ३५ कोटी रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. मात्र  हा निधीमधून आवश्यक ठिकाणी कामे झालेली दिसून येत नसल्याच्या आरोपासह त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील पीडब्ल्यूडी कॅम्प्समध्ये गुरूवारी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले आहे.

भिवंडीच्या या गावांच्या रस्त्यांची कामे खासगी जागेमध्ये आवश्यकता नसताना केलेली असल्याचा आरोपही या आंदोलनकांकडून करण्यात आला आहे. तर काही कामे झालेली नसताना बोगस बिल काढलेली असल्याचे वास्तव श्रमजीवीने पीडब्ल्यूडीचे अधिक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमुद करून जाब विचारला आहे.या कामामध्ये ठेकेंदांरानी अधिकाºयांशी संगनमत करून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोस्टरव्दारेही उघड केले आहे.श्रमजीवीचे जेष्ठ पदाधिकारी सुनील लोणे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या ठिय्या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांसह पुरूषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधून ठेकेदांरांसह संबंधीत अधिकाºयांवर कारवाईची मागणी लावून घेतली आहे.आदिवासी विभागच्या निधीतून ३० ते ३५ कोटी खर्चाची रस्ते, पूल व काँक्रेटच्या रस्त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून श्रमजीवीने त्या विरोधात तीव्र आंदोलन करून पीडब्ल्यूडीला धारेवर धरले आहे.

पीडब्ल्यूडीच्या कॅम्पसमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी आज दिवसभर ठिय्या आंदोलन छेडून प्रशासनाला धारेवर धरले. या भष्ट्राचारातील ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्यास पाठिशी घालणाºया अभियंत्या विरोधात या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या भष्टचाराचा जाब विचारण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी सुनील लोणे यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी विविध घोषणांचे पोस्टर घेऊन या आंदोलनात सहभाग घेतला. या आदोलनात श्रमजीवीचे राज्य सरचिटणीस बाळाराम भोईर, प्रमोद पवार, जया पारधी, अशोक सापटे, संगिता भोमटे, जयेंद्र गावित आदी कार्यकर्त्यांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग घेऊन येथील बाधकाम विभागाला जाब विचारला आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी