शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तहसील कार्यालयावर श्रमजीवींचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 03:17 IST

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

कल्याण : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार अमित सानप यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या आठवडाभरात मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे, असे आश्वासन सानप यांनी मोर्चाला दिले आहे.श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात नीरा जाधव, विष्णू वाघे, गणेश भामरे, नंदू जाधव, कोंडू मुकणे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कल्याण तालुक्यातील टिटवाळ्यातील गणेशवाडी, उतणे कातकरीपाडा, राया कलमवाडी, कोलम कातकरीपाडा, फळेगाव कातरीपाडा, वाहोली कातकरीपाडा, नडगाव, खाकरवाडी, कोम्याचीवाडी, पळसोली वैतागवाडी, वरप कातकरीवाडी या भागांमध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. तेथील रहिवाशांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा होत नाही. आदिवासींना हक्काची घरे दिलेली नाहीत. लहान मुलांचा कुपोषणाने मृत्यू होत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकेवरील आदिवासीधारकाला ३५ किलो अन्नधान्य दिले पाहिजे. ते दिले जात नाही. त्याचा काळाबाजार केला जात आहे. आदिवासीपाड्यात विजेची व्यवस्था नाही. स्वतंत्र स्मशानभूमी नाही. अंगणवाड्यांची व्यवस्था नाही. स्तनदा व गरोदर मातांना आरोग्याची सुविधा नाही. ठाकरपाडा, मठाचीवाडी, चौरा, कोलम, दहिवलीवाडी, कोसले, काकडपाडा, गेरसा, ओझर्ली आदी २६ पाड्यांवर मुख्य रस्त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते तयार केलेले नाहीत. आदिवासींच्या कब्जेवहिवाटीवरील जागेवर चुकीचे शेरे मारले आहेत. ते दुरुस्त केले जावेत, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :kalyanकल्याण