शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारणे सांगण्यापेक्षा एकजुटीने काम करा, आयुक्तांची ठाणे जि.प. अधिकाऱ्यांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 20:39 IST

जिल्ह्याचा विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागात योजना राबवताना येणाºया अडचणी कोणत्या आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी सगळ्या संवर्गाणी कामाचे नियोजन कसे करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या फ्लॅगशीप योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मीयतेने काम करा. संस्थात्मक काम करताना ती संस्था स्वत:ची आहे. या भावनेने काम करायला हवे तरच योजनांची फलश्रुती होईल,

ठळक मुद्देसरकारच्या फ्लॅगशीप योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मीयतेने काम करासंस्थात्मक काम करताना ती संस्था स्वत:ची आहे. या भावनेने काम करायला हवे

ठाणे : अधिकारी-कर्मचा-यांनी कामाच्या बाबतीत कारणे सांगण्यापेक्षा एकजुटीने काम करायला हवे. तरच जिल्ह्याचा शाश्वत विकास होईल. यासाठी तुम्ही करत असलेल्या कामाला दर्जेदार वेळ द्या , कारणे सांगण्यापेक्षा एक जुटीने काम करा या तंबीसह कानमंत्र कोंकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी ठाणेजिल्हा परिषदेच्या अधिका-यांना दिला. एका कार्यक्र माप्रसंगी आले असता ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात सन २०१६ - १७ च्या वार्षिक तपासणी टिपणी अहवाल वाचन कार्यक्र माला पाटील उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्याचा विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागात योजना राबवताना येणा-या अडचणी कोणत्या आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी सगळ्या संवर्गाणी कामाचे नियोजन कसे करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या फ्लॅगशीप योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मीयतेने काम करा. संस्थात्मक काम करताना ती संस्था स्वत:ची आहे या भावनेने काम करायला हवे तरच योजनांची फलश्रुती होईल, असेही पाटील यांनी अधिका-यांना जाणीव करून दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उप आयुक्त  गणेश चौधरी, उप मुख्य कार्यकारी  चंद्रकांत पवार उपस्थित होते.आयुक्तांनी केलेल्या सूचना लक्षात घेवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन भीमनवार यांनी यावेळी दिले. शिवाय जिल्ह्याच्या विकास कामाला गती मिळावी, सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. या आढावा बैठकीला प्रकल्प संचालक डॉ. रु पाली सातपुते, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे, डी. वाय. जाधव, संतोष भोसले, डॉ. मनिष रेंघे, छाया शिसोदे, आर. एम. आडे, मयूर हिंगणे, एल. पवार आदी अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदthaneठाणे